हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Home Remedies) आजकाल पाठदुखी ही अत्यंत सामान्य सामान्य मानली जाते. कारण, बहुतेक लोकांना पाठीच्या समस्या असल्याचे दिसून आले आहे. उठताना, बसताना, चालताना आणि अगदी झोपताना सुद्धा पाठीत कळा जाणे अत्यंत त्रासदायी असते. महत्वाची बाब म्हणजे, पाठदुखीचे समस्या तरुण मंडळींमध्ये मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे. सतत एका जागी खुर्चीत बसून लॅपटॉप किंवा कॉम्प्युटरवर काम केल्याने शरीराची हालचाल कमी होते. तसेच वाकून बसने, पोक काढून चालणे यामुळे देखील पाठीचा कणा दुखावतो. त्यामुळे तरुणांमध्ये पाठदुखी गंभीर समस्या होत चालली आहे.
काय सांगता? तुम्हीही पाठदुखीने त्रस्त आहात? मग आज आम्ही तुम्हाला जी माहिती देणार आहोत त्याच्या सहाय्याने तुम्ही पाठदुखी पळवून लावू शकता. कारण अनेक लोकांना सोप्प्या घरगुती उपायांविषयी माहिती नसते. परिणामी मोठमोठ्या शस्त्रक्रियांचे सामोरी जावे लागते. त्यापेक्षा वेळीच अशा घरगुती उपायांचा अवलंब केला तर लवकर आराम मिळतो. चला तर पाठदुखीचा समस्येवर रामबाण ठरतील असे घरगुती उपाय (Home Remedies) जाणून घेऊया.
पाठदुखीच्या त्रासापासून सुटका देतात ‘हे’ घरगुती उपाय (Home Remedies)
1. हळदीचे दूध – हळदीमध्ये वेदना कमी करणारे गुण समाविष्ट असतात. त्यामुळे गरम दुधात हळद मिसळून पिणे फायदेशीर ठरते. हळदीतील दाहक विरोधी गुणधर्म पाठदुखीच्या तीव्र वेदनांपासून आराम देतात.
2. आल्याचा रस – आल्यामध्ये देखील वेदनांवर प्रभावी काम करणारे दाहक विरोधी गुणधर्म असतात. त्यामुळे आल्याचा रस मधात मिसळून प्यायल्याने पाठदुखीच्या वेदनांपासून आराम मिळतो.
3. ताज्या पुदिन्याचा रस – पुदिना स्वभावाने थंड असला तरीही यामध्ये अँटी इंफ्लेमेटरी गुण मोठ्या प्रमाणात समाविष्ट असतात.(Home Remedies) यामुळे ताज्या पुदिन्याचा रस प्यायल्यानेदेखील पाठदुखीपासूनही आराम मिळतो.
4. गरम पाण्याची पिशवी – जर तुमच्या पाठीच्या वेदना तीव्र असतील तर अशावेळी तुम्ही गरम पाण्याच्या पिशवीचा वापर करू शकता. गरम पाण्याच्या पिशवीत गरम पाणी भरून पाठीला चांगला शेक द्या. यामुळे हळूहळू वेदना कमी होऊ लागतात आणि आराम मिळतो.
5. ऑलिव तेल – पाठदुखीने त्रस्त असाल तर ऑलिव्ह ऑईलचा मसाज अत्यंत परिणामकारक ठरतो. (Home Remedies) यासाठी ऑलिव्ह ऑइल गरम करून घ्या आणि ते कोमट झाल्यावर संपूर्ण पाठीला व कंबरेला मसाज करा. असे केल्याने काही वेळात पाठदुखी थांबते.
6. नियमित व्यायाम – अनेक लोकांना व्यायामाचा कंटाळा येतो. ज्यामुळे रोजच्या बैठ्या कामाने अखडलेले स्नायू पुढे जाऊन पाठदुखीचा समस्येचे कारण बनतात. पाठदुखीपासून सुटका हवी असेल तर नियमित सकाळी व्यायाम आणि स्ट्रेचिंग करणे गरजेचे आहे.