हनीट्रॅपचा बळी : अश्लील व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी दिल्याने तरूणाची आत्महत्या

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कोल्हापूर | हातकणंगले तालुक्यातील एकाने हनीट्रॅपमध्ये अडकल्याने गळफास घेवून आत्महत्या केली आहे. सोशल मिडियाच्या माध्यमातून बदनामी करण्याची धमकी दिल्यामुळे संतोष मनोहर निकम (वय- 35, रा. शाहूनगर परिसर, चंदूर ) असे आत्महत्या केलेल्या यंत्रमाग कामगाराचे नांव आहे. पोलिस व नातेवाईकांनी मोबाईलची पडताळणी केल्यानंतर हनीट्रॅपचा प्रकार पुढे आला. आत्महत्त्येच्या घटनेची नोंद इचलकरंजीतील शिवाजीनगर पोलिस ठाण्यात झाली आहे.

याबाबतची माहिती मिळताच शिवाजीनगर पोलिस दाखल झाले. पोलिस व नातेवाईकांनी त्याच्या मोबाईलची पडताळणी केली. त्यावेळी हनीट्रॅप चा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. गेल्या काही दिवसांपासून हरियाणा येथील नेहा शर्मा नामक तरुणीने सोशल मीडियाच्या माध्यमातून संतोष याच्याशी संपर्क केला. या माध्यमातून दोघांमध्ये व्हिडीओद्वारे संवादही सुरू होता.

या तरुणीने स्वत:अश्लील चाळे करून संतोषला आपल्या जाळ्यात अडकवले. त्याचा व्हिडीओ तिने रेकॉर्ड केला. त्यानंतर तरुणीने पैशांची मागणी सुरू केली होती. संतोषने पैसे देण्यास नकार दिल्यानंतर अश्लील व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी दिली. आपण हनीट्रॅप मध्ये फसल्याचे लक्षात आल्यानंतर संतोष नैराश्यात होता. त्यातूनच त्याने गळफास घेवून आत्महत्त्या केल्याची चर्चा आहे. या अनुषंगाने शिवाजीनगर पोलिसांनी मोबाईल ताब्यात घेतला असून चौकशी सुरू केली आहे. घटनेची फिर्याद मनोहर निकम यांनी दिली आहे.