हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Hong Kong Fire जागतिक पटलावरून एक मोठी आणि धक्कादायक बातमी समोर येत आहे. एकाच भागातील ७ इमारतींना भीषण आग लागली आहे. या आगीत आत्तापर्यंत ४४ लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे, तर ३०० हुन अधिकजण गंभीररित्या जखमी आहेत. इमारती उंचच उंच असल्याने बचावकार्याला मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतोय.आगीची हि घटना हॉंगकॉंग मध्ये घडली आहे.
नेमकं काय घडलं ? Hong Kong Fire
हाँगकाँगमधील तैपो येथील बुधवारी (26 नोव्हेंबर 2025) 7 बहुमजली इमारतींमध्ये आग लागली. ज्यावेळी आगीची घटना घडली, त्यावेळी लोक मोठ्या संख्येने घरात होते. लोकांना घरातून बाहेर पडण्याची साधी संधी देखील मिळाली नाही, आग तर दुसरीकडे अगदी वाऱ्यासारखी पसरत गेली. या हाऊसिंग कॉम्प्लेक्सच्या बाहेर बांबूचे मचान आणि बांधकाम जाळ्या लावण्यात आल्या होत्या. त्यामुळे आग इतर इमारतींमध्ये वेगाने पसरली. या आगीत आतापर्यंत 44 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 300 जण बेपत्ता असल्याची माहिती समोर येत आहे. हि आग कशी लागली याचा तपास आता केला जात आहे. पोलिसांनी याप्रकरणी ३ संशयितांना ताब्यात घेतलं आहे.
अग्निशामक दल घटनास्थळी
सध्या अग्निशमन दलाकडून बचावकार्य सुरु आहे. आग विझविण्यासाठी (Hong Kong Fire) आणि लोकांना बाहेर काढण्यासाठी 700 हून अधिक अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी सतत काम करत आहेत. परंतु धूर, उंची आणि अरुंद पायऱ्या यामुळे बचाव कार्य करताना मोठा अडथळा निर्माण होत आहे. अनेक ठिकाणी, उंच मजल्यांवरून पाणी फवारण्यासाठी हायड्रॉलिक शिड्यांचा वापर केला जात आहे. विशेष म्हणजे आग काल दुपारी लागली असली तरीही रात्री उशीरापर्यंत ही आग विझली नव्हती. इमारतींची उंची जास्त असल्याने आग विझवण्याचे मोठे आव्हान आहे.




