कराडात भाजपच्या ज्येष्ठ कार्यकर्त्यांचा सन्मान

BJP Karad News
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनिधी । सकलेन मुलाणी
भारतीय जनता पक्षाची स्थापना 6 एप्रिल 1980 रोजी करण्यात आली. या स्थापना दिनास 43 वर्षे पूर्ण झाल्याने कराडात भाजप पक्षाचा 43 वा स्थापना दिन अनोख्या पद्धतीने साजरा करण्यात आला. यावेळी कराड येथील भाजपच्या ज्येष्ठ कार्यकर्त्यांचा स्नेह मेळावा घेण्यात आला. यावेळी त्यांचा सन्मानपत्र, शाल-श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला.

कराड येथील नगरपालिका शाळा नंबर 9, मंगळावर पेठ येथे भाजपा नेते विष्णू काका पाटसकर यांच्या संकलपनेतून कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे आयोजन भाजप युवा मोर्चा सरचिटणीस सुदर्शन विष्णू पाटसकर यांनी केले. कार्यक्रमास प्रमुख राष्ट्रीय स्वयं सेवक संघ कोल्हापूर विभाग कार्यवाहक विजय राव जोशी यांची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी सुदर्शन पाटसकर म्हणाले, “हिंदुत्व, हिंदू राष्ट्रवाद आणि अखंड मानवतावाद हे (कै.) डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी, पंडित दीनदयाळ उपाध्याय यांचे सिद्धांत घेऊन भारतीय जनता पक्षाची स्थापना भारतरत्न (कै.) अटलबिहारी वाजपेयींच्या नेतृत्वात झाली. 1984 च्या निवडणुकीत भाजपचे दोन खासदार निवडून आले. दोन खासदारांपासून सुरू झालेले या प्रवासात असंख्य चढ उतार पक्षाने पाहिले. या प्रवासात असंख्य नेते व कार्यकर्त्यांचे योगदान अतुलनीय आहे. आज 303 खासदार आहेत. देशात भारतीय जनता पक्षाची अनेक राज्यात सत्ता आहे. पक्षाचा प्रवास कार्यकर्ते यांची ध्येयशक्ती व निष्ठा या बळावरच आधारलेली असेल.

‘या’ कार्यकर्त्यांचा करण्यात आला सन्मान

यावेळी सन्मान सोहळ्यात भरत पाटील, आनंदराव जगताप, प्रकाश शेवाळे, कृष्णत यादव, नाना सावंत, सूर्यकांत पडवळ, अधिक सोमदे, राजेंद्र पवार, रामचंद्र उमाराणी, व्यंकटराव जगताप, विश्वास साळुंखे, शंकर पाटील, इलाही मुजावर, शिवाजी पानसकर, संदीप पाटील आदी भाजपच्या जेष्ठ कार्यकर्त्यांचा सन्मान करण्यात आला.