नांदेड प्रतिनिधी । नांदेडमध्ये तीन दिवसीय होट्टल सांस्कृतिक व पर्यटन महोत्सवाला सुरवात झाली आहे. या म्होतसवाचे १७ ते १९ जानेवारी या कालावधीत आयोजन करण्यात आले असून, या महोत्सवाद्वारे जिल्हावासियांना सांस्कृतिक मेजवानी मिळणार असल्याचे जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनी सांगितले़.
शुक्रवारी सायंकाळी ५ वाजता सार्वजनिक बांधकाममंत्री अशोक चव्हाण यांच्या हस्ते या महोत्सवाचे उद्घाटन करण्यात आलं. तत्पूर्वी ४.३० ते ५ या वेळेत ऐश्वर्य परदेशी व भार्गव देशमुख यांच्या गायन व तबलावादनाचा कार्यक्रम आपणं झाला. उद्घाटन सोहळ्यानंतर रात्री ७ ते १० या वेळेत सिनेतारका तसेच प्रसिद्ध नृत्यांगणा शर्वरी जमेनीस यांच्या संचाचा अमृतगाथा हा कथ्यक नृत्यावर आधारित कार्यक्रम पार पडला.
रविवारी सायंकाळी ५ वाजता पर्यटन व पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत महोत्सवाचा समारोप होणार आहे़. त्यानंतर सायंकाळी ७ ते ८ या वेळेत गायक संजय जोशी व संचातर्फे ‘गीत रामायण’ कार्यक्रमाचे सादरीकरण करण्यात येणार आहे़ रात्री ८ ते ९ या वेळेत विजय जोशी यांचे लोकसंगीत तर रात्री ९ ते १० यावेळेत औरंगाबाद येथील निरंजन भाकरे व संचाकडून भारुडाचे सादरीकरण केले जाणार आहे़.