भारताने बंदी घालताच TikTok चे स्पष्टीकरण, म्हणाले..

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली । केंद्रातील मोदी सरकारने Tiktok, शेयर इट यांसारख्या लोकप्रिय ऍपसह जवळपास ५९ App वर अधिकृत बंदी घालत चीनवर डिजिटल स्ट्राईक केल्याची चर्चा होत आहे. गेल्या काही दिवसांपासून या दोन्ही देशांमध्ये वाढणारा तणाव या ऍपबरील बंदीसाठी खतपाणी घालून गेला. सुरक्षेच्या दृष्टीनं आणि अर्थातच चीनच्या मुजोरीला धडा शिकवण्यासाठी म्हणून हा निर्णय घेतला गेल्याची जोरदार चर्चा आहे. असं असतानाच बंदीचा निर्णय येताच अवघ्या काही तासांमध्ये आता TikTok इंडियाकडून काही महत्त्वाच्या गोष्टी स्पष्ट करण्यात आल्या आहेत.

TikTok च्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरुन आपण चीनच्या सरकारला कोणत्याही प्रकारची माहिती दिली नसल्याचं या निवेदनात म्हटलं आहे. ‘भारत सरकारनं जारी केलेल्या ५९ ऍप ब्लॉक करण्याच्या अंतरिम आदेशामध्ये टिक टॉकचाही समावेश आहे. आम्ही या आदेशाचं पालन करत आहोत. सदर प्रकरणी आम्हाला सरकारी अधिकाऱ्यांसोबतच्या बैठकीचं बोलावणं आलं आहे. जेथे आमची बाजू मांडत स्पष्टीकरण देण्याची संधी मिळणार आहे. संरक्षित बाबी आणि डेटा प्रायव्हसीबाबतच्या सर्व अधिनियमांचं टिक टॉकनं पालन केलं असून आमच्याकडून कोणत्याही प्रकारची माहिती परदेशी आणि चिनी सरकारला देण्यात आलेली नाही. भविष्यातही असं केलं जाणार नाही. ऍपच्या वापरकर्त्यांची गोपनीयता आणि अखंडता यालाच आम्ही प्राधान्य देतो’, असं निखिल गांधी यांच्या नावे प्रसिद्ध करण्यात आलेल्या या निवेदनात स्पष्ट करण्यात आलं.

सोशल मीडियावर अतिशय लोकप्रिय झालेल्या या ऍपनं एक प्रकारची लोकशाहीच आणली आहे हा मुद्दा त्यांनी अधोरेखित केला. शिवाय टिक टॉकच्या माध्यतून उदरनिर्वाह करणाऱ्यांची संख्याही अधिक असल्याची बाबही त्यांनी लक्षात आणून दिली. तेव्हा आता हे स्पष्टीकरण ऍपसाठी फायद्याचं ठरणार का, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

 

Leave a Comment