हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | भारतामध्ये अनेक मोठं मोठे महामार्ग आहेत. जिथून मोठ्या प्रमाणात वाहतूक होते. यामुळे देशाच्या विकासालाही चालना मिळते. महामार्ग झाल्यामुळे मालाची ने – आण ही कमी कालावधीत होते. तसेच प्रवाश्यांचा प्रवास हा अधिक सुखकर होतो. त्यामुळे महामार्गचे अनेक फायदे आहेत. परंतु तुम्हाला हे माहितीये का की देशातील राष्ट्रीय महामार्गांना नाव आणि नंबर कसे दिले जातात. चला तर मग जाणून घेऊयात….
कशी दिली जातात महामार्गाला नावे आणि क्रमांक?
राष्ट्रीय महामार्गाचा सर्व कारभार हा NHAI कडे म्हणजेच भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे असतो. त्याद्वारे महामार्गाचे कामकाज पाहिले जाते. याच संस्थेच्या माध्यमातून देशातील राष्ट्रीय महामार्गाची संबंधित बाबींची देखरेख केली जाते. तसेच देशातील राष्ट्रीय महामार्गांचे नाव ठेवण्यासाठी एक विशेष नियम पाळला जातो. त्यानुसार देशातील राष्ट्रीय महामार्गास नंबर दिले जातात आणि नाव दिले जातात.
उत्तरेकडून दक्षिणेकडे जाणाऱ्या सर्व महामार्गांना दिले जातात सम क्रमांक –
भारतातील उत्तरेकडून दक्षिणेकडे जाणाऱ्या महामार्गाना सम क्रमांक दिले जातात. तर पूर्वेकडून पश्चिमेकडील महामार्गाना क्रमांक हा वाढत्या क्रमांकांनी दिला जातो. उदाहरणार्थ, समजून घ्यायचे झाल्यास समसंख्या असलेले महामार्ग म्हणजे 8 आणि 44 असे आपण गृहीत धरू. तसेच वाढत्या क्रमांकांची संख्या म्हणजे ईशान्येकडील राज्यांमध्ये असलेल्या महामार्गांची संख्या ही कमी असेल तर गुजरात व राजस्थान सारख्या राज्यातून जाणाऱ्या महामार्गांची संख्या जास्त असेल.
उत्तरेकडून दक्षिणेकडे जाणाऱ्या महामार्गाच्या संख्येत होते वाढ
तुम्ही पूर्वेकडून पश्चिमेकडे जाणाऱ्या सर्व महामार्गांचा विचार केला तर या महामार्गांना विषम संख्या देण्यात आलेले आहेत. या महामार्गाचे क्रमांक लक्षात घेतले तर 1,3,17 आणि 77 असे असतात. त्यामुळे जेव्हा तुम्ही उत्तरेकडून दक्षिणेकडे जाता तेव्हा तुम्हाला लक्षात येईल या राष्ट्रीय महामार्गांच्या संख्येत वाढ होते. म्हणजेच जम्मू काश्मीर मधून 1 या क्रमांकाचा राष्ट्रीय महामार्ग जात असेल तर बिहारमधून 19 क्रमांकाचा आणि 87 क्रमांकाचा महामार्ग तामिळनाडू राज्यातून जातो. यावरून लक्षात येते की, दिशेनुसार राष्ट्रीय महामार्गाना क्रमांक दिले जातात.
राष्ट्रीय महामार्गाचे सहाय्यक महामार्ग कोणत्या प्रकारचे असतात?
राष्ट्रीय महामार्गाचे सहाय्यक महामार्ग यांना तीन अंकी क्रमांक दिले जातात. म्हणजेच राष्ट्रीय महामार्ग 301, 501,701 आणि 701A अशा प्रकारचे राष्ट्रीय महामार्गाचे सहाय्यक महामार्ग असतात. तसेच यामध्ये 128,128A, 128C, 128D, 328,328A अशा पद्धतीचे क्रमांक देण्यात आलेले आहेत. अश्या प्रकारे राष्ट्रीय महामार्गाना नावे दिले जातात.