महाकाय व्हेल मासा किनाऱ्यालगत येतात तरी कसे? जाणून घ्या सविस्तर

Whale Fish
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | गणपतीपुळे किनाऱ्यालगत आलेल्या व्हेल माश्याच्या पिलाला जिवंत ठेवण्यासाठी अनेक प्रयत्न करण्यात आले. त्यामध्ये यश आले मात्र अखेर या पिलाचा मृत्यू झाल्यामुळे सगळीकडे हळहळ व्यक्त केली जात आहे. इथे प्रश्न पडतो की, एवढा महाकाय असलेला व्हेल मासा किनाऱ्यालगत येतो तरी कसा? त्याची कारणे काय आहेत? त्याचबद्दल जाणून घेऊयात.

काय आहेत कारणे?

व्हेल मासा हा आकाराने प्रचंड मोठा आणि वजनाने अधिक असलेला हा मासा समुद्राला ओहटी येते तेव्हा त्या पाण्याच्या जोराने किनाऱ्यालगत येण्याची शक्यता असते. अश्यात समुद्र किनारी येणाऱ्या या माश्याची संख्या वाढत आहे. त्यामुळे त्याची कारनेही विचारली जात आहेत.

तसेच जेव्हा व्हेल मासा हा शिकार करताना बांगडा, तारली, आणि माकूळ यांचा पाठलाग करतात तेव्हा ते किनाऱ्याकडे येऊ शकतात.

कधी कधी हे मासे खोल समुद्रात पोहताना कार्गो बोट तसेच प्रवासी बोटीच्या पंख्याला अडकून त्यांना इजा होते तेव्हा ते आसरा घेण्यासाठी किनाऱ्यालगत येतात.

समुद्रातून तेल मिळवण्यासाठी मानव निर्मित इकोसाऊंडर समुद्रात सोडले जाते. त्यांच्या अवाजामुळे या माश्यांची पोहण्याची दिशा भरकटली जाते आणि परिणामी ते किनाऱ्यालगत येऊन पोहचतात.

ध्वनी आणि वारंवारीता यामुळेही व्हेल मासे किनारपट्टीपर्यंत येतात. म्हणजेच व्हेल मासे हे एकमेकांशी संवाद साधण्यासाठी वेगवेगळ्या वारंवारतेचा उपयोग करतात. त्याची क्षमता ही 150 किलो हर्ट्झच्या वरची असल्यामुळे त्या वारंवारितेचे इतर ध्वनी त्यांच्या ऐकण्याच्या प्रणालीत अडथळे निर्माण करतात. यामुळे हे प्राणी आपली दिशा भरकटु शकतात. आणि ते किनाऱ्यालगत  येतात. हे देखील एक कारण सांगितले जाते.

हवामानातील बदलामुळेही हे मासे समुद्रालगत येतात.

किनाऱ्यालगत येऊन मृत्यूमुखी का पडतात?

गणपतीपुळे किनाऱ्यालगत आलेल्या व्हेल माश्याच्या पिलाचा मृत्यू झाल्यामुळे या माश्यांचा किनाऱ्यालगत येऊन मृत्यू का होतो? असा प्रश्न तुम्हाला असेल. तर यामध्ये प्रामुख्याने

व्हेल माश्याचे वजन आणि आकार इतका मोठा असतो की त्यामुळे ते किनाऱ्यालगत आल्यावर वापस पाण्यात जाण्यासाठी त्यांना अवघड जाते. या वजनामुळे त्यांचे पाण्याबाहेर इंद्रिय दबली जातात. त्यांची त्वचा पाणी नसल्यामुळे सुकू लागते आणि त्यामुळे त्याखालील चरबीच्या  थरामुळे  शरीरात खूप उष्णता निर्माण होते. या अतिउष्णतेमुळे डिहायड्रेशन होते आणि परिणामी या जलचरांना मृत्यला सामोरे जावे लागते.

हवामान ही अशी गोष्ट आहे जी निसर्गाच्या सुरळीत चक्राला फिरवू शकते. त्यामुळे त्याचा परिणाम या माश्यावर होतो. हवामानातील बदलामुळे हे मासे किनारी येतात आणि बोटीला धडकून मरण पावतात.