तुमच्या आधारकार्डला किती मोबाईल सिम लिंक आहेत; ‘अशा’ प्रकारे करा चेक

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली । आधार कार्ड हे प्रत्येक नागरिकासाठी आवश्यक आणि महत्त्वाचे आयडेंटिटी प्रूफ आहे. बँक खाते उघडण्यापासून ते मोबाईल सिम खरेदी करण्यापर्यंत आधार कार्ड जवळपास सर्वत्र आवश्यक आहे. अशा परिस्थितीत जर कोणी आपल्या आधारचा गैरवापर करत असेल तर आपल्याला कळतही नाही.

मोबाईल सिमकार्डच्या बेकायदेशीर वापराच्या पार्श्वभूमीवर, टेलिकॉम डिपार्टमेंट (DoT) ने अलीकडेच टेलिकॉम अ‍ॅनालिटिक्स फॉर फ्रॉड मॅनेजमेंट अँड कंझ्युमर प्रोटेक्शन (TAFCOP) टूल लॉन्च केले आहे. या ऑनलाइन टूल/पोर्टलच्या मदतीने युझर्स आपल्या आधार क्रमांकाशी लिंक केलेले सर्व फोन नंबर तपासू शकतात.

TAFCOP वेबसाइटद्वारे, तुम्ही तुमच्या आधार कार्डवर आतापर्यंत किती सिम जारी केले आहेत हे सहजपणे शोधू शकाल. याशिवाय, तुम्ही ते नंबर देखील काढू शकता जे तुमच्या आधारवरून जारी केले आहेत. जर तुमच्या नकळत तुमच्या आधार क्रमांकाशी कोणताही मोबाइल क्रमांक जोडला गेला असेल, तर तुम्ही त्याबद्दल तक्रारही करू शकता.

तुम्ही अशा प्रकारे ऑनलाइन करू शकता
1. तुमच्या आधार लिंक केलेल्या मोबाइल सिमबद्दल जाणून घेण्यासाठी, तुम्हाला पहिले https://tafcop.dgtelecom.gov.in/ वर जाणे आवश्यक आहे.
2. येथे तुम्हाला तुमचा फोन नंबर टाकावा लागेल.
3. यानंतर तुम्हाला ‘Request OTP’ बटणावर क्लिक करावे लागेल.
4. यानंतर, तुम्हाला तुमच्या मोबाईल नंबरवर मिळालेला OTP टाकावा लागेल.
5. आता तुमच्या आधार क्रमांकाशी संबंधित सर्व क्रमांक वेबसाइटवर दिसतील.
6. जेथे युझर्स वापरात नसलेले किंवा यापुढे आवश्यक नसलेले नंबर नोंदवू शकतात आणि ब्लॉक करू शकतात.

Leave a Comment