हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । जर तुम्ही तुमचे भविष्य उज्ज्वल करण्यासाठी जास्त उत्पन्न असलेल्या देशांत नोकरी पत्करून आपले राहणीमान उंचावू इच्छिता तर जगाच्या पाठीवर असे काही देश आहेत जिथे तुम्ही तुमच्यातील क्षमता सिद्ध करून त्यायोगे अधिक उत्पन्न मिळवू शकता. पण त्यासाठी कोणत्या देशात नेमका किती पगार आहे हे जाणणे गरजेचे आहे. आज आम्ही तुम्हाला अशी बातमी देत आहोत ज्यातून कोणत्या देशातील कर्मचाऱ्यांना मासिक किती उत्पन्न मिळते? हे तुम्ही जाणून घेऊ शकता आणि त्याद्वारे भविष्यातील तुमची नोकरी संदर्भातील रूपरेषा आखू शकता. त्यासाठी खालील माहिती वाचणे आवश्यक आहे.
तुम्हाला जास्त पगार हवा असेल तर जाणून घ्या कोणत्या देशात नोकरी केल्यास तुम्हाला किती पगार मिळेल त्याची यादी पाहूया…
युरोपातील स्वित्झर्लंड हा देश या यादीत पहिल्या क्रमांकावर येतो. स्वित्झर्लंडमधील कर्मचाऱ्यांना दरमहा सरासरी $6,096 (रु. 5,04,495) वेतन मिळते. या कारणास्तव, परदेशी काम करण्याची इच्छा असणाऱ्यांना हा देश नेहमीच खुणावत असतो.
या यादीतील दुसरा देश म्हणजे लक्झेंबर्ग. लक्झेंबर्ग हा देखील युरोपियन देश आहे. हा देश मजबूत अर्थव्यवस्थेसाठीही ओळखला जातो. या देशातील कर्मचाऱ्यांना दरमहा सरासरी $५०१५ (रु. ४,१४,९९५) वेतन मिळते.
दक्षिण पूर्व आशियातील देश सिंगापूर या यादीत तिसऱ्या क्रमांकावर आहे. वर्ल्ड ऑफ स्टॅटिस्टिक्सच्या डेटावरून असे दिसून येते की सिंगापूरमधील कर्मचाऱ्यांना दर महिन्याला सरासरी $4,989 (रु. 4,12,780) वेतन मिळते.
या यादीत चौथ्या क्रमांकावर युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका – जो देश आपल्या देशातील कर्मचाऱ्यांना सरासरी दरमहा $4,245 (रु. 3,51,205) उत्पन्न देतो.
पाचव्या क्रमांकावर आइसलँड हा देश आहे जो आपल्या देशातील कर्मचाऱ्यांना सरासरी दरमहा $4,007 (रु. 3,31,481) इतके उत्पन्न देतो.
ह्या रांगेत कतार हा देश $ 3982 (रु. 329359) वेतनासह सहाव्या क्रमांकावर येतो.
तर सातव्या क्रमांकावर डेन्मार्क हा देश येतो जो आपल्या देशातील कर्मचाऱ्यांना सरासरी $3,538 (रु. 2,92,547) प्रति महिना पगार देतो
तसेच संयुक्त अरब अमिराती हा देश आपल्या कर्मचाऱ्यांना वेतन देण्याच्या बाबतीत $3,498 (रु. 2,89,239) रुपयांच्या सरासरीसह आठव्या क्रमांकावर येतो.
त्यामागे नेदरलँड आणि ऑस्ट्रेलिया हे देश दरमहा $3,494 (रु. 2,84,000) सरासरी महिना ) आणि $3,391 (रु. 2,80,439) रुपयांच्या सरासरी पगारसह नवव्या आणि दहाव्या क्रमांकावर येतात तर भारतातील कर्मचाऱयांना दर महा 47,383 रुपये इतके वेतन मिळते आणि वेतन देण्यात येणाऱ्या देशांच्या यादीत भारत देश हा अनुक्रमे 65 व्या स्थानी येतो. उपरोक्त माहिती वरून तुम्ही तुम्हाला कोणत्या ? देशांत नोकरीला जायचे आहे हे ठरवू शकता आणि त्याप्रमाणे त्या देशांत नोकरीच्या किती संधी आहेत हे जाणून घेऊ शकता.