हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | गेल्या काही वर्षांपासून आपल्या राज्यामध्ये सुशिक्षित बेरोजगारांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढलेले होते. अनेक तरुण हे त्याचे करिअर घडवण्यासाठी नोकरीसाठी मुंबई, पुणे यांसारख्या शहरांमध्ये लाखो स्वप्न त्यांच्या डोळ्यात घेऊन येत होते. परंतु गेल्या काही वर्षात महाराष्ट्रात सरकारी नोकऱ्या मिळणे, खूप कठीण झाले होते. या काळात अनेक घोटाळे झाले, तसेच प्रशासकीय कामकाज लांबवले गेले. पेपर फुटी झाली. यामुळे या तरुणांना अनेक आव्हानांना सामोरे जावे लागले. त्यामुळे सरकारी नोकरी करण्याचे त्यांचे स्वप्न मात्र बाजूला राहिले. परीक्षा जरी झाली, तरी नोकर भरती वेळेवर होत नव्हती. निकाल वेळेवर लागत नव्हते. यामुळे अनेक तरुणांचा सरकारी यंत्रणांवरील विश्वास देखील उडायला लागला होता.
परंतु या सगळ्या वातावरणात देखील आपल्या राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मात्र लाखो तरुणांना एक आशेचा किरण दाखवला. आणि त्यांनी राज्यातील शैक्षणिक प्रक्रियेमध्ये सुधारणा केली. भरती प्रक्रियेत देखील मोठ्या प्रमाणात परिवर्तन झाल्याचे दिसून आले आहे. नोकरीमध्ये पारदर्शकता आली आणि विद्यार्थ्यांना त्यांच्या कार्यक्षमतेवर नोकऱ्या देखील मिळाल्या. आता आपण सुशिक्षित बेरोजगारांचे प्रमाण वाढण्यामागे तसेच सरकारी भरती न होण्यामागे नक्की कोणती कारणे होती? आणि महायुती सरकारने यासाठी कोणती पावले उचलली हे जाणून घेणार आहोत.
पेपर फुटीचे आरोप
गेल्या काही वर्षापासून सरकारी भरतीच्या पेपर फुटीचे प्रकार मोठ्या प्रमाणात आढळून आलेले आहेत. त्यामुळे नोकर भरतीमध्ये विलंब आलेला आहे. शिक्षक पात्रता परीक्षा असो किंवा महाराष्ट्र आरोग्य विभाग भरती परीक्षा असेल अनेक परीक्षांमध्ये भ्रष्टाचाराच्या आरोप लावले गेले. त्याचप्रमाणे 2020 ते 22 या दरम्यान अनेक उमेदवारांची निराशा झालेली होती.
पारदर्शकतेसाठी यंत्रणेत सुधारणा झाल्या
गेल्या काही वर्षापासून परीक्षा तसेच इतर अनेक गोष्टींबद्दल नागरिकांच्या मनात संभ्रम निर्माण होता. परंतु महायुती सरकारने या शिक्षण प्रक्रियेत पारदर्शकता आणण्याचा चांगला प्रयत्न केलेला आहे. या परीक्षेच्या प्रणालीत त्यांनी वेगवेगळ्या सुधारणा केलेल्या आहेत. आणि योजना देखील असलेल्या आहेत. गेल्या दोन वर्षात विविध विभागांमध्ये 1 लाखापेक्षाही अधिक कर्मचाऱ्यांची भरती झालेली आहे. आणि या बदलांमुळे राष्ट्रीय मानकांच्या बरोबरीने मूल्यमापन देखील झालेले आहे. यामुळे विद्यार्थ्यांच्या बुद्धिमत्ताला आणि त्यांच्या कष्टाला देखील वाव मिळाला आहे.
शैक्षणिक क्षेत्रात सुधारणा
देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली राज्यातील शिक्षण पद्धतीमध्ये अनेक अमुलाग्र बदल घडविण्यात आलेले आहेत. शिक्षक भरतीसाठी पवित्र ऑनलाईन पोर्टलची ओळख देखील झालेली आहे. तसेच या प्लॅटफॉर्ममुळे गावात प्रदीर्घ काळाची शिक्षकांच्या कमतरतेमुळे याचा थेट निराकरण झालेले आहे. 2024 च्या सुरुवातीस या पोर्टल द्वारे 11 हजारांपेक्षा जास्त शिक्षकांची पदे भरण्यात आलेली आहे. यामुळे भ्रष्टाचाराचा धोका देखील कमी झालेला आहे. आणि खेड्यातील मुलांना देखील चांगले शिक्षण मिळत आहे.
पोलीस भरती सुधारणा
राज्यामध्ये सर्वात मोठी पोलीस भरती आयोजित करण्यात आलेली होती. यामध्ये कॉन्स्टेबल या पदाच्या 17000 रिक्त जागा होत्य. आणि या पदासाठी तब्बल 1.7 दशलक्ष अर्ज आलेले होते. ही भरती संपूर्ण डिजिटल पद्धतीने झालेली आहे. तसेच नवीन पडताळणी देखील झालेली आहे. यामुळे या भरतीत येणारे अनेक अडथळे दूर झालेले आहे. या पारदर्शक पद्धतीमुळे गुणवत्तेत देखील सुधारणा झालेली आहे.
फसवणुकीविरोधी कडक कायदे
राज्यामध्ये अनेक गैरप्रकार तसेच फसवणूक होत होते. यावेळी महाराष्ट्र स्पर्धा परीक्षा कायदा 2024 लागू केला. या नवीन कायद्यात फसवणूक करणाऱ्यांना पाच वर्षापर्यंत तुरुंगवासाची शिक्षा ठोठावण्यात येणार आहे. तसेच जे पात्र उमेदवार आहे, त्यांना सरकारी नोकऱ्या आता चांगल्या पद्धतीने मिळणार आहेत. असा विश्वास देखील तरुणांच्या मनात निर्माण झालेला आहे.