नवी दिल्ली | ड्रायव्हिंग लायसेन्स काढायचं म्हटलं की आर.टी.ओ. कार्यालयाच्या चकरा आणि ५ – ६ महिणे वेटींग या गोष्टी आपल्याला वैताग आणतात. यापार्श्वभूमीवर केवळ सात दिवसात तुमचं लायसेन्स तुमच्या हातात मिळणार असं म्हटलं तर कोणाला खरं वाटणार नाही. पण होय, हे खरं आहे. लायसेन्ससाठी माराव्या लागणार्या फेर्या आता बंद होणार आहेत कारण आर.टी.ओ. च्या नवीन नियमानुसार आता सातच दिवसांत ड्रायव्हिंग लायसेन्स मिळणार आहे.
पूर्वी सारथी सॉफ्टवेअर नावाची कंपनी आर.टी.ओ. साठी लायसेन्स काढण्याचे काम करत होती. मात्र आता सदर काॅन्ट्रेक्ट निक्सी कंपनीकडे देण्यात आले आहे. नवीन नियमांनुसार आर.टी. ओ.ऑफिस मध्ये ड्राइव्हिंग लायसेन्स ची परीक्षा घेणार नाहीत. तर त्यांच्या जागेवर एजन्सी चे लोक सगळया परिक्ष घेतील.
या नियमाला खूप विचार करून बनवलं आहे .
सगळ्या वाहन चालकांना सहज व सोप्यारीतीने लायसन्स उपलब्ध व्हावे हा त्यामागचा उद्देश आहे. या निर्णयामुळे प्रत्येकाला लायसन्स वेळेत मिळेणार आहे. आम्ही सात दिवसांत ड्रायव्हिंग लायसन्स देऊ असा विश्वास निक्सी कंपनीने व्यक्त केला आहे.