बिझनेस करायचाय? सरकार देतंय २५ लाखांचं कर्ज

business tips
business tips
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

टीम, HELLO महाराष्ट्र | बर्याचजणांना बिझनेस करण्याची इच्छा असते, त्यात त्यांचे डोके असते, परंतु पैश्यअभावी सारे राहून जाते. मात्र आता तुम्हाला तुमची इच्छा सोडून देण्याची इच्छा नाही. सरकार बिझनेस करु इच्छिणार्या तरुणांना अल्प व्याजदरात चक्क २५ लाखांचे कर्ज देत आहे. शिवाय सरकार या कर्जावर सबसिडी ही देत आहे.

इतर महत्वाचे –

B.A. पास

बेरोजगारी आणि शिक्षणाच्या बाजारीकरणाविरोधात ‘डीवायएफआय-एसएफआय’ चे मानवी साखळी आंदोलन

स्माॅल इंडस्ट्रीज डेव्हलपमेंट बँक आॅफ इंडिया (सीडबी) या बँकेच्या स्माईल नावाच्या योजनेअंतर्गत सदर कर्ज देण्यात येत आहे. सर्व्हिस सेक्टर आणि मॅन्यूफॅक्चरिंग अशा दोन प्रकारच्या उद्योगांकरता कर्ज दिले जात अाहे. सर्व्हिस सेक्टर करता १५ लाख रुपये तर मॅन्यूफॅक्चरिंग करता २५ लाख रुपये कर्ज मिळत आहे.

सरकार या कर्जावर भक्कम सबसिडीही देत असल्याने युवकांसाठी हे फायद्याचे ठरत आहे. खुल्या प्रवर्ग गटातील युवकांना शहरी भागात व्यवसाय करण्याकरता १५% सबसिडी देण्यात येत आहे तर ग्रामिण भागात व्यावसाय करण्याकरता २५% सबसिडी दिली जात आहे. विशेष प्रवर्गातील युवकांना २५% आणि ३५% सबसिडी अनुक्रने शहरी आणि ग्रामिण भागात व्यावसाय करण्याकरता देण्यात येत आहे.

इथे करा आॅनलाईन अर्ज –
https://www.kviconline.gov.in/pmegpeportal/jsp/pmegponline.jsp