हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन । सध्याच्या काळात ऑनलाईन पेमेंट करण्याचे प्रमाण चांगलेच वाढले आहे. यासाठी UPI हे सर्वांत जास्त वापरले जाणारे प्लॅटफॉर्म आहे. तसेच अनेक कंपन्यांनी आपले UPI Apps देखील लाँच केले आहेत. ऑनलाईन पेमेंटचे प्रमाण वाढण्याबरोबरच त्यामधील फसवणुकीच्या घटनांमध्ये देखील वाढ झाली आहे. अशी फसवणूक होऊ नये यासाठी आपल्या योग्य ती काळजी घेणे आवश्यक आहे. याबाबतीत अनेक कंपन्या ग्राहकांना सतत सावध करत असतात.
भारतातील सर्वात मोठी सरकारी बँक असलेल्या SBI ने तर यासाठी एक व्यापक मोहीमच हाती घेतली आहे. SBI ने आपल्या ग्राहकांसाठी काही सिक्योरिटी गाइडलाइन जारी करत त्यांना सावधगिरी बाळगण्यास सांगितले आहे. UPI द्वारे पेमेंट करताना ग्राहकांनी कशी काळजी घ्यावी हे खाली दिलेल्या स्टेप्सद्वारे समजून घेउयात…
आपला मोबाईल पिन आणि UPI पिन नेहमी वेगवेगळा ठेवा.
युपीआयशी संबंधित कोणत्याही अज्ञात रिक्वेस्ट्सना प्रतिसाद देऊ नका.
नेहमी संशयास्पद रिक्वेस्ट्स किंवा कॉल्सची तक्रार करा.
लक्षात ठेवा की पिन फक्त पैसे ट्रान्सफर करण्यासाठी आवश्यक आहे आणि पैसे मिळवण्यासाठी नाही.
कोणताही संशयास्पद ट्रान्सझॅक्शन आढळल्यास, तुमच्या खात्यावरील युपीआय सर्व्हिस ताबडतोब बंद करा.
अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://www.npci.org.in/what-we-do/upi/product-overview
हे पण वाचा :
Share Market ची वाटचाल पुढील आठवड्यात कशी असेल ??? तज्ज्ञांचे मत जाणून घ्या
Yes Bank चे कर्ज महागले, बँकेकडून MCLR मध्ये करण्यात आली वाढ !!!
Gold Price : गेल्या आठवडाभर सराफा बाजाराची स्थिती कशी होती ??? जाणून घ्या
Penny Stocks मध्ये पैसे गुंतवण्यापूर्वी लक्षात ठेवा ‘या’ गोष्टी !!!
Gold Investment : जोखीम असूनही सोन्यामध्ये गुंतवणूक करण्याछा सल्ला तज्ज्ञ का देतात??? जाणून घ्या