नवी दिल्ली | लाॅकडाउनमध्ये बंद असणारी भारतीय रेल्वे आता मंगळवार पासून पुन्हा सुरु होणार आहे. यामुळे देशाच्या विविध भागांत अडकलेल्या नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. मात्र रेल्वेचे तिकिट कसे काढायचे याबाबत अनेकांच्या मनात शंका आहे. त्याबाबत आता IRCTC ने खूलासा केला असून तिकिट विक्री उद्या सोमवार, ११ मे पासून सुरु होणार आहे.
रेल्वेचे तिकिट बुक करण्यासाठी प्रवाशांना IRCTC ची अधिकृत वेबसाईट https://www.irctc.co.in/ ला भेट द्यावी लागणार आहे. १२ तारखेपासून सुटणार्या रेल्वेगाड्यांच्या बुकिंग करता तिकिट फक्त आॅनलाईन पद्धतीनेच काढता येणार आहे. IRCTC कडून एजंट कडून तिकिट विक्रीला प्रतिबंध केला आहे. तसेच तात्काळ तिकिट सुविधाही बंद ठेवण्यात येणार असल्याचे रेल्वेकडून सांगण्यात आले आहे. तसेच करंट बुंकिंग सुविधाही बंद असणार आहे. त्यामुळे प्रवाशाना तिकिट काढण्यासाठी IRCTC ची वेबसाईट किंवा अधिकृत मोबाईल अॅप चा वापर करावा लागणार आहे.
Tickets shall be booked only online on IRCTC website or through Mobile App. Booking of tickets through ‘agents’, (both IRCTC and Railway) shall not be allowed. No provision of tatkal and premium tatkal accommodation. No Current booking shall be allowed: Ministry of Railways
— ANI (@ANI) May 10, 2020
दरम्यान, एसी चे डबे उपलब्ध राहणार असून त्याचे भाडे राजधानी एक्सप्रेसच्या पटीमध्ये राहणार आहे असे रेल्वेकडून सांगण्यात आले आहे. तसेच प्रवाशांना रेल्वेप्रवासादरम्यान सोशल डिस्टंसिंगच्या नियमांचे पालन करणे बंधनकारन राहणार आहे. तोंडाला मास्क लावूनच प्रवाशांना संपुर्ण प्रवास करावा लागणार आहे.
रेल्वेचे तिकिट काढण्यासाठी खालील गोष्टी करा –
१) ११ मे रोजी संध्याकाळी ठिक ४ वाजता आॅनलाईन बुंकिंग सुविधा सुरु होणार आहे. तेव्हा या वेळेत https://www.irctc.co.in/ या रेल्वेच्या अधिकृत वेबसाईटवर लाॅगइन व्हा.
२) बरोबर ४ वाजता बुकिंग सुरु होईल तेव्हा तुमच्या प्रवासाचे ठिकाण निवडून तुमचे तिकिट बुक करा. आणि आॅनलाईन पेअमंट करा.
३) कोणत्याही एजंटला जादाचे पैसे देऊन स्वत:ची फसवणुक करुन घेऊ नका. तुम्ही तुमच्या मोबाईलवर देखील रेल्वेचे तिकिट बुक करु शकता.
४) तात्काळ सेवा बंद ठेवण्यात आल्याने तुम्हाला आॅनलाईन तिकिट बुक करणे हा एकमेव मार्ग आहे. तेव्हा जो सर्वांत आधी प्रक्रिया पार पाडेल त्याला सर्वांत अगोदर तिकिट मिळणार आहे. तेव्हा वेळ चुकवू नका.
५) यातूनही तुम्हाला तिकिट मिळाले नाहीच तर निराश होऊ नका. कारण एकाच वेळी अनेकजणांनी बुकिंगसाठी प्रयत्न केल्याने वेबसाईट हँग पडण्याची शक्यता असते. मात्र रेल्वे खाते तांत्रिक बिघाड होणार नाही यासाठी काळजी घेतील.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.