CIBIL Score म्हणजे काय? तो कसा चेक करायचा? या Steps वापरा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मित्रानो, कोणत्याही बँकेतून कर्ज घेत असताना तुमचा सिबिल स्कोर (CIBIL Score) महत्त्वाची भूमिका बजावतो. सिबिल स्कोरचा फुल्ल फॉर्म क्रेडिट इन्फॉर्मेशन ब्युरो इंडिया लिमिटेड असा आहे. सिबिल स्कोर म्हणजे असा 3 अंकी नंबर असतो जो तुमची संपूर्ण क्रेडिट हिस्ट्रीची (Credit History) माहिती दर्शवतो. एखाद्या व्यक्तीने त्याचे कर्ज कसे फेडले त्याच्या आधारावर सिबिल स्कोर तयार केला जातो. त्यामुळे सिबिल स्कोर चांगला ठेवणं गरजेचं असत.

CIBIL Score चे फायदे काय?

सिबिल स्कोअर हा 300 ते 900 च्या दरम्यान मोजला जातो. जर तुमचा सिबिल स्कोर चांगला असेल तर याचा अर्थ असा मानला जातो कि आत्तापर्यंत तुम्ही घेतलेल्या कर्जाची परतफेड अगदी वेळेत करत आहात. त्यामुळे समाजात तुमची किंमतही वाढते आणि तुम्हाला कर्ज मिळण्याचा मार्ग मोकळा होतो. CIBIL स्कोअर 900 च्या जवळ असेल तर ग्राहकाला कर्ज किंवा क्रेडिट कार्ड मिळण्याची शक्यता जास्त असते.

असा चेक करा तुमचा CIBIL Score –

सर्वप्रथम https://www.cibil.com/ या वेबसाईटवर जा आणि पेजच्या वरच्या उजव्या कोपर्‍यात ‘Get Your CIBIL Score’ वर क्लिक करा. इथे आधी तुम्हाला सब्‍सक्रिप्‍शन ऑप्‍शंन पेज दिसेल, फ्री ऑप्शनसाठी खाली स्क्रोल करा.

त्यानंतर तुम्हाला अकाउंट (Account) तयार करावे लागेल. यासाठी तुमचा ईमेल आयडी, नाव, पासवर्ड, आयडी प्रूफ (जसे की पॅन कार्ड, मतदार आयडी, पासपोर्ट क्रमांक, आधार), जन्मतारीख, पिन कोड आणि मोबाइल क्रमांक टाकावा लागेल. हे सर्व डिटेल्स भरल्यानंतर Agree And Continue वर क्लिक करा.

त्यांनतर तुम्हाला तुमचे अकाउंट Verify करावं लागेल. त्यानुसार तुम्ही जो मोबाईल नंबर दिला आहे त्यावर तुम्हाला वन-टाइम पासवर्ड (OTP) मिळेल. OTP एंटर करा आणि ‘Continue’ वर क्लिक करा.

यांनतर तुमचा क्रेडिट स्कोअर तपासण्यासाठी ‘Go to Dashboard’ वर क्लिक करा.

तुम्हाला myscore.cibil.com वर नेले जाईल. येथे तुम्ही तुमचा CIBIL स्कोर आणि CIBIL डिटेल्स अगदी फ्री मध्ये चेक करू शकता.