How To Check Purity Of Gold | भारतातील स्त्रियांना तसेच पुरुषांना सोन्याचे दागिने खूप आवडतात. अनेक लोक हे केवळ सोन्याचे दागिने घालतात त्याचप्रमाणे अनेक सोन्याच्या वस्तू देखील तयार करून घेतात. भारतामध्ये सोने हा धातू मोठ्या प्रमाणात विकला जातो. परंतु अनेकवेळा या 24 कॅरेट सोन्याच्या नावाखाली फसवणूक होत असतात. अनेकजण शुद्ध सोन्या ऐवजी कमी दर्जाचे सोन्याचे दागिने बनवतात. आणि हॉलमार्क असलेला हा दागिना खऱ्या सोन्यापासून तयार केला जातो असे समजले जाते. परंतु आजकाल बनावट हॉलमार्क असलेले दागिने विकले जाण्याच्या प्रकरणांमध्ये दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. त्यामुळे आज आपण शुद्ध सोने कसे ओळखावे आणि सोन्याचे दागिने कधी कधी करताना ते कसे तपासावे हे जाणून घेणार आहोत.
ब्युरो ऑफ इंडियन स्टॅंडर्ड म्हणजे बीआयएस संस्थेचे हॉलमार्क असलेले दागिने ओळखण्यात कोणत्याही प्रकारची गडबड होत नाही. असे गृहीत धरले जाते. नियमानुसार सोन्याचे दागिने विकताना बीआयएसने दिलेल्या नियमांचे पालन करणे खूप गरजेचे असते. 14, 18 आणि 22 कॅरेट सोन्याचे दागिने विकण्याचा नियम आहे. म्हणजे तुम्हाला जर एखादा ज्वेलरी 20 किंवा 21 कॅरेटचे सोने देत असेल, तर याचा अर्थ तुमच्यासोबत मोठी फसवणूक होत आहे. सोन्यामध्ये 24 कॅरेटचे सोने सर्वाधिक शुद्ध मानले जाते. परंतु 24 कॅरेट सोन्याचे दागिने तयार केले जात नाही. कारण हे सोने अत्यंत मऊ असते. आणि तुटण्यास सोपे असते. परंतु तुम्ही जर 24 कॅरेटचे सोने विकत घेत असाल, तर तुमची फसवणूक होत आहे हे तुम्ही गृहीत धरा.
हॉलमार्कचे चिन्ह कसे ओळखावे? | How To Check Purity Of Gold
सोन्याचे दागिने खरेदी करताना त्यावरील हॉलमार्कचे चिन्ह तपासणे खूप गरजेचे असते. हे चिन्ह त्रिकोणी आकाराचे असते. तसेच यावर सहा अंकांचा हॉलमार्क युनिक आयडेंटिफिकेशन नंबर असतो. तसेच काही इंग्रजी अक्षरे आणि अंक देखील आढळतात. प्रत्येक दागिन्यांचा हा युनिक आयडेंटिफिकेशन नंबर हा वेगळा असतो. कोणत्याही दोन दागिन्यांचा नंबर सारखा असू शकत नाही. तसेच 22 कॅरेट सोन्यावर 916, 18 कॅरेट सोन्यावर 750 तर 14 कॅरेट सोन्यावर 585 हा क्रमांक लिहिलेला असतो. त्यामुळे या अंकांवरून तुम्ही दागिना नक्की किती कॅरेट्स आहे हे ओळखू शकता.
सोन्याची किंमत कशी ठरवली जाते?
आज-काल सोन्याच्या किमती दिवसेंदिवस वाढत चाललेले आहेत. त्यामुळे आता हा सोन्याचा भाव नक्की कसा ठरवला जातो हे आपण जाणून घेणार आहोत. 24 कॅरेट 22 कॅरेट 18 कॅरेट आणि 14 कॅरेटच्या सोन्याचा भाव हा वेगवेगळा असतो. 22 कॅरेट दागिन्यांमध्ये 91.66% सोने असते. त्याचप्रमाणे 18% सोन्यामध्ये 75 टक्के सोने असते. तर 14 कॅरेट सोन्यामध्ये 58.1% सोने असते. त्यानुसार आता बाजारात काय भाव चालू आहे यानुसार या सोन्याची किंमत ठरवली जाते.