नवी दिल्ली : देशभरातील शेतकऱ्यांसाठी PM किसान योजनेअंतर्गत 2000 रुपये हप्ता जमा करण्याचे काम सुरु आहे. या योजनेशी संबंधित शेतकऱ्यांना दरवर्षी सरकार कडून 6000 जमा केला जातात. मात्र जर तुमच्या खात्यावर अजूनही या योजेनेचा आठवा हप्ता जमा झाला नसेल तर याबाबतची तक्रार तुम्ही केंद्रीय कृषी मंत्रालयाकडे करू शकता.
अशा प्रकारे करा तक्रार
जर PM किसानचा हप्ता जमा झाला नसेल तर तुम्ही ऑनलाईन, टेलिफोन, प्रत्यक्ष देखील तक्रार करू शकता. हप्ता जमा झाला नसल्याची तक्रार सर्वप्रथम तुमच्या क्षेत्रातील लेखापाल आणि कृषी अधिकारी यांच्याशी संपर्क साधून करा. जर तुमच्या तक्रारीची दखल घेतली जात नसेल तर त्यासबंधित हेल्पलाईनवर देखील कॉल करू शकता.
ऑनलाईन तक्रार करण्यासाठी
जर तुम्हांला ऑनलाईन तक्रार करायची असेल तर PM KISAN help Desk वर ईमेल करून तक्रार देऊ शकता. त्याकरिता ई -मेल आय डी आहे..
याशिवाय 01123381092 या डायरेक्ट हेल्पलाईन नंबर वर देखील संपर्क करू शकता.
दरम्यान मागील अनेक दिवसांपासून या योजनेबाबत तक्रारी येत आहेत. नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांना ही पैसे मिळत नसल्याच्या अनेक तक्रारी मध्ये म्हटले आहे. एकाच गावातील काही शेतकऱ्यांच्या खात्यात दोन हजार रुपये जमा झाले आहेत तर काही शेतकऱ्यांच्या खात्यात ही रक्कम जमा झाली नाही. अशा लोकांनी प्रथम त्यांच्या लेखापाल आणि कृषी अधिकाऱ्यांना विचारावं की त्यांचं नाव लाभार्थ्यांच्या यादीत आहे की नाही जर असेल तर मग पैसे का आले नाहीत ते त्यांना विचारा. शासनाचा एखादा अधिकारी या योजनेत अडथळा ठरत असेल तर त्याची तक्रार करा.
प्रधानमंत्री किसान च्या अधिकृत वेबसाईटला भेट देऊन आपण आपलं स्टेटस तपासू शकता. आपल्याला आतापर्यंत किती हप्त्यांचे पैसे मिळाले आहेत? तसेच पुढील हप्त्याची स्थिती काय आहे? जर एखादा हप्ता रोखण्यात आला आहे त्यामागचं कारण काय आहे? जर तुम्हाला वाटतं की माहितीमध्ये गडबड आहे? तर तुम्ही त्यात सुधारणा सुद्धा करू शकता.
असा पहा तुमचा स्टेटस
1)प्रथम प्रधानमंत्री किसान योजनेच्या http://pmkisan.gov.in या संकेतस्थळाला भेट द्यावी लागेल.
2)त्यासोबत ‘beneficiary status’ या पर्यायावर क्लिक करा.
3)त्यानंतर नवीन पेज ओपन होइल.
4) यावर आधार कार्ड क्रमांक, बँक अकाउंट नंबर किंवा मोबाइल यापैकी एक पर्याय निवडा.
5) या तीन क्रमांकाच्या माध्यमातून तुमच्या बँक खात्यात पैसे येतात की नाही हे तुम्ही तपासू शकता.
6) तुम्ही जो पर्याय निवडला आहे त्या ठिकाणी योग्य तो क्रमांक भरा.
7) त्यानंतर ‘Get deta’ या पर्यायावर क्लिक करा.
8) मग तुम्हाला तुमच्या सर्व व्यवहाराची माहिती मिळेल.
9) कुठल्या बँक खात्यात पी एम किसान योजनेच्या हप्त्याचे पैसे जमा झाले आहेत याची देखील माहिती मिळेल.
या योजनेचा पहिला हप्ता हा दरवर्षी 1 एप्रिल ते 31 जुलै या कालावधीमध्ये मिळतो दुसरा हप्ता एक ऑगस्ट ते 30 नोव्हेंबर आणि तिसरा हप्ता एक डिसेंबर ते 31 मार्च या कालावधीत मिळतो मोदी सरकारने 24 फेब्रुवारी 2019 रोजी या योजनेची सुरुवात केली आहे.
राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी हॅलो महाराष्ट्र सोबत जोडले जा. आम्हाला फॉलोअ करा WhatsApp Group | Facebook Page