अहंकारी सरकारला चांगल्या सुचनांची ॲलर्जी, मजुरांना आर्थिक मदतीचे आवाहन :राहुल गांधी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली: 2020 प्रमाणे याही वर्षी देशातकोरोनाने हाहाकार माजवला आहे. किंबहुना मागच्या वर्षीच्या तुलनेत कोरोना हा गंभीररित्या वेगानं देशात पसरत आहे. अशा सर्व बाबींमध्ये भरडला जातोय तो देशातील सर्वसामान्य वर्ग. केंद्र सरकार लसीकरण त्यासोबतच इतर उपाय योजना राबवत आहे. अशातच केवळ लसीकरण पुरेसे नाही तर मजुरांच्या हातात पैसे देणे आवश्यक आहे असे राहुल गांधी यांनी म्हटले आहे. त्यांनी आपल्या अधिकृत ट्विटर अकाउंट वरून ट्विट केले आहे.

या ट्विटमध्ये राहुल गांधी यांनी म्हटलं आहे की,’ केंद्र सरकारच्या अपयशी धोरणांमुळे देशात कोरोनाची भयंकर दुसरी लाट निर्माण झाली आहे आणि प्रवासी कामगारांना पुन्हा पळ काढण्यास भाग पाडले गेले आहे. लसीकरण वाढवण्याव्यतिरिक्त, त्यांच्या हातात पैसे देणे आवश्यक आहे – सामान्य माणूस आणि देशाची अर्थव्यवस्था दोन्हीसाठी’.

दरम्यान मागील वर्षी मोठ्या प्रमाणात कोरोनालाट पसरल्यामुळे अनेक मजूर आपल्या मूळ गावी गेले होते. मध्यंतरी कोरोनाची लाट ओसरल्यानंतर हे मजूर पुन्हा कामाच्या शोधात देशभरात विखुरले. मात्र आता पुन्हा एकदा कोरोनाची दुसरी लाट आल्यामुळे मजुरांवर पुन्हा एकदा ‘जैसे थे’ची परिस्थिती ओढवाली आहे. मागील वर्षी या मजुरांसाठी केंद्र सरकारने मदत जाहीर केली होती. मात्र याही वर्षी आर्थिक मदत देणे गरजेचे असल्याचे मत काँग्रेस नेते आणि खासदार राहुल गांधी यांनी केले आहे.

अहंकारी सरकारला सुचनांची ऍलर्जी

याच ट्वीटमध्ये राहुल गांधी यांनी ‘ अहंकारी सरकारला सूचनांची एलर्जी ‘असल्याचं म्हटलं आहे. दरम्यान कोरोना गंभीर ची स्थिती आल्यापासून राहुल गांधी यांनी केंद्र सरकारला अनेक सूचना केल्या आहेत.

राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी हॅलो महाराष्ट्र सोबत जोडले जा. आम्हाला फॉलोअ करा  WhatsApp Group | Facebook Page

Click Here to Join Our WhatsApp Group

Leave a Comment