मेरा राशन अंतर्गत आता करू शकता रेशन दुकानदाराची तक्रार

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली : केंद्र शासनाने ‘एक देश एक राशन’ ही योजना सुरु केली आहे. या योजनेमुळे ग्राहक देशात कोणत्याही रेशन दुकानात धान्य खरेदी करू शकतो. याच योजनेअंतर्गत केंद्र सरकारच्या सार्वजनिक वितरण विभागानं ‘मेरा राशन’ हे मोबाईल ॲप आणलेले आहे. या ॲपद्वारे आपण आपल्या नावावर मिळणाऱ्या अन्नधान्याची माहिती मिळवू शकतो. या ॲप द्वारे रेशन कार्डधारकांना मंजूर असलेले धान्य,उचल करण्यात आलेले धान्य याची माहिती मिळणार आहे.एवढेच नाही तर रेशन दुकानदारांची तक्रार फक्त एका क्लिक वर करू शकणार आहोत. हे अँप आता सध्या इंग्रजी आणि हिंदी भाषेत उपलब्ध आहे.

काय आहेत फायदे

1) हे ॲप प्ले स्टोर वरून डाऊनलोड करता येते.

2) सार्वजनिक वितरण व्यवस्थे अंतर्गत लाभ मिळण्यास संबंधित रेशन कार्ड धारक पात्र किंवा अपात्र याबाबतची माहिती या ॲप वर उपलब्ध आहे.

3) रेशन दुकानदार विषयी तक्रारही दुकान क्रमांक व मोबाईल क्रमांक टाकून करता येते.

4) रेशन दुकानदाराकडून लाभार्थ्यांना घेतलेले धान्य याबाबत माहिती शिधापत्रिकेचा क्रमांक टाकल्यानंतर आपल्या पाहता येते.

5) शिधापत्रिका आणि आधार लिंक झालेले असल्यास आधार क्रमांक टाकून ही माहिती उपलब्ध होते.