जाणून घ्या विमानामध्ये कोणते इंधन वापरतात आणि एक विमान किती मायलेज देते याबाबत

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | बऱ्याच लोकांची विमाना कडे बघून कुतूहल का वाढते. या कुतूहलामध्ये ते कसे उडते, यापासून त्याला कुठल्या प्रकारचे इंधन लागते व त्या इंधनामध्ये ते किती प्रकारचे प्रमाणात मायलेज देते. याबद्दल प्रश्न मनात पडत असतात. यासाठी आम्ही आज तुम्हाला विमानामध्ये वापरले जाणारे इंधन व त्याचे प्रकार, त्याच्या किमती, आणि विमान किती मायलेज देते याबाबत सांगणार आहोत.

इंडियन ऑईल एविएशन सर्व्हिस ही भारतातील आघाडीची इंधन कंपनी आहे. जी, आंतरराष्ट्रीय आणि देशांतर्गत विमान कंपन्यांना जेट इंधन पुरवते. विमानातील इंजिनच्या प्रकारानुसार त्यामध्ये कोणत्या प्रकारचे इंधन वापरले जाईल हे ठरविले जाईल. व्यावसायिक विमानात आणि लाडाखु विमानात वापरलेली इंधन रॉकेल आधारित असतात. यामध्ये पूर्णपणे शुद्ध रॉकेल वापरला जातो. या व्यतिरिक्त, कुड अडीटीव्ही देखील वापरले जातात. हे अ‍ॅडिटीव्ह्ज अँटी ऑक्सिडंट्स, अँटीफ्रीझ, हायड्रोकार्बन इत्यादींचा वापर आहेत.

बोइंग 747 प्रत्येक सेकंदाला 4 लिटर इंधन वापरते. हे प्रति मिनिट 240 लिटर आणि ताशी 14,400 लिटर आहे. टोकियो ते न्यूयॉर्क शहर जाण्यासाठी बोईंग 747 ला अंदाजे 1,87,200 लिटर इंधन आवश्यक आहे. बोईंगच्या संकेतस्थळावर देण्यात आलेल्या माहितीवरून असे दिसते की हे जेट इंजिन प्रति किलोमीटर इंधन 12 लिटर वापरते. याची क्षमता 2,38,840 लिटर इंधन आहे.

You might also like