जोडीदार निवडताय, मग घाबरु नका – आमच्यासोबत या, आणि समजून घ्या कशी करायची जोडीदाराची विवेकी निवड

विवेकी निवड
विवेकी निवड
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

लव्हगुरु | सध्याची तरूण पिढी आपल्या पार्टनर निवडीबाबत फार प्रो आहे. पटकन अापला आपणच पार्टनर निवडतात. मग त्यांच्या घरच्यांना समजतं. किंवा स्वतःहूनच सांगतात. मग तिथपासून ते लग्नापर्यंतचा प्रवास. काहींचे पालक पटकन अॅग्री होतात (हे प्रमाण अल्प आहे). तर ‘माझ्या लग्नाचा निर्णय मीच घेणार’ हे समजावण्यासाठी काहींना पालकांसोबत झगडावं लागतं. मग अॅग्री होतात. तरी नंतर खटके उडणे वगैरे आलंच. काहींच्या घरचे इतके कर्मठ असतात की जोडप्याला टोकाचे निर्णय घ्यावे लागतात. किंवा काहींना घरच्यांना दुखवायचं नसतं, म्हणून घरच्यांच्या म्हणण्याप्रमाणे स्वतःच्या मनाविरूद्ध वागावं लागतं. ही तडजोड अशक्य वेदनादायी असते.

काही दिवसांपूर्वी तेलंगणामधल्या दुर्दैवी घटनेनं संवेदनशील मनांना हादरवून सोडलं. अमृता-प्रणय.
अमृताने घरच्यांच्या विरोधात जाऊन लग्न केलं होतं. प्रणय वेगळ्या जातीचा होता. कर्मठ पालकांना ते मान्य नव्हतं. पालक इतक्या खालच्या पातळीला उतरले की, स्वतःच्या सख्ख्या मुलीच्या प्रेमाला संपवून टाकलं. ह्यांसारख्या दुर्दैवी घटना रेअर असल्या तरी याची दहशत मुलामुलींच्या मनात बसून जाते. मला सगळ्याच पालकांना अमृताच्या पालकांसारख्यांच्या पंगतीत बसवायचं नाही. तसे कोणी नसतातच. पण काही कर्मठ पालक असतात. तो कर्मठपणा जातीय, धार्मिक, वर्गीय अहगंडातून आलेला असतो किंवा अाणखी कशातून. पालक लोक समाजातली पत, लोक काय म्हणतील वगैरे बुरसट विचार करून अापल्या मुलामुलीच्या जोडीदार निवडीच्या स्वातंत्र्याबाबत नकारघंटा वाजवत असतात.

आईबाप आपले जगातील सर्वश्रेष्ठ हितचिंतक असतात हे खरं असलं तरी, आपल्या मुलाचं/मुलीचं हित कशात आहे हे आपल्यापेक्षा त्यांना जास्ती कळू शकते ह्याची काही आईबापांना कल्पनाही नसते. ते त्यांना समजावून सांगणे कठीण काम. आणि म्हणुनच आम्ही घेऊन आलोय जोडीदाराची विवेक निवड ही संवादशाळा. ही संवादशाळा जात-धर्म, बाह्यरूप याच्यापलिकडे जाऊन जोडीदार निवडीबाबत विचार करायला प्रवृत्त करते. ही कार्यशाळा तरूण आणि पालक दोघांसाठी असली तरी पालकांचा प्रतिसाद अल्प असतो. पण ही कार्यशाळा पालकांसाठीपण तितकीच, किंबहुना जास्त महत्वाची आहे. अमृता-प्रणय या दुर्दैवी घटनेने पालकांचं काऊंसिलिंग किती महत्वाचं आहे हे दाखवून दिले.

अमृताच्या पालकांना असं कोणी काऊंसिलिंग करणारं भेटलं असतं तर?
मी परत सांगतो मला सगळ्याच पालकांना अमृताच्या पालकांच्या पंगतीत बसवायचं नाही. पण सगळेच आपल्या मुलामुलीचं म्हणणं सहज स्वीकारतात असंही नाही.अशा सर्व पालकांचे या संवादशाळेमुळे मतपरिवर्तन होऊ शकते. तुम्हाला असं वाटत असेल आपण आपल्या पालकांना समजावून सांगणं जमत नाहीये, कमी पडतोय तर त्यांना जोडीदाराची विवेकी निवड या संवादशाळेला अाग्रहाने घेऊन या. तुमच्या बघण्यात मित्रमैत्रिणींचे असे पालक असतील तर त्या मित्रमैत्रिणींना या संवादशाळेबद्दल माहिती द्या. तरूणांनी तर यावंच. पण पालकांसाठीपण ही संवादशाळा खूप महत्वाची आहे.

कधी? ३० सप्टेंबर २०१८
कुठे? साने गुरूजी स्मारक, दांडेकर पूलाजवळ, पर्वती पायथा, सिंहगड रोड, पुणे

वेळ – सकाळी ९ ते ५
नोंदणी शुल्क – १०० रुपये.

अधिक माहिती व पूर्वनोंदणी साठी संपर्क :-

स्नेहल- 9763950450
अक्षय- 9960997579
तुषार- 7448149036