हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | देशातील 18 वर्षापेक्षा जास्त वय असणाऱ्या प्रत्येक नागरिकाकडे मतदान कार्ड असते. मतदान कार्ड अत्यंत महत्त्वाचा आपल्या ओळखीचा पुरावा आहे. आपण भारतीय असल्याचा तसेच अठरा वर्ष पूर्ण असल्याचा हा एक खूप मोठा पुरावा आहे. आपली ओळख पडताळून पाहण्यासाठी या मतदान ओळखपत्राचा फायदा होतो. शासकीय कागदपत्रांमध्ये हे एक अत्यंत महत्त्वाचे असे कागदपत्र आहे. जर तुमचे हेच ओळखपत्र हरवले असेल, तरी देखील तुम्हाला ते ऑनलाईन पद्धतीने डाऊनलोड करता येते. परंतु त्यासाठी तुमचा मोबाईल नंबर हा तुमच्या मतदान कार्डला लिंक असणे खूप गरजेचे असते. परंतु तुमचा हा मोबाईल नंबर तुमच्या वोटिंग कार्डला लिंक नसेल तर तो लिंक करणे खूप गरजेचे असते. आता यासाठी ऑनलाइन पद्धतीने अपडेट करणे, खूप सोपे झालेले आहे. आता मतदान कार्डला तुमचा मोबाईल नंबर घरबसल्या तुम्ही कशा प्रकारे लिंक करू शकता. हे आज आपण जाणून घेणार आहोत.
अनेकवेळा लोकांकडून त्यांचे मतदान कार्ड हरवते. अत्यंत महत्त्वाच्या कामानिमित्त हे मतदान कार्ड लागले, तरी त्यांना ते मिळत नाही परंतु अशा वेळेला तुमचा मोबाईल क्रमांक तुमच्या मतदान कार्डला लिंक असेल, तर हे ऑनलाईन पद्धतीने हे मतदान कार्ड पुन्हा डाऊनलोड करू शकता. त्यासाठी आधी मोबाईल नंबर ओळखपत्राची लिंक कसा करायचा? हे आज आपण जाणून घेणार आहोत.
मतदान काढला मोबाईल क्रमांक लिंक कसा करावा ?
- मतदान कार्डला मोबाईल क्रमांक लिंक करण्यासाठी तुम्हाला सगळ्यात आधी ऑफिशियल नॅशनल वॉटर सर्विस या अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी लागेल.
- या वेबसाईटवर गेल्यानंतर तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर ईमेल आयडी पासवर्ड कॅपच्या कोड टाकून लॉगिन करायचे आहे.
- तुम्ही जर नवीन युजर असाल तर तुम्हाला साइन इन करावे लागेल.
- यानंतर तुमच्या मोबाईल नंबरवर वन टाइम पासवर्ड प्राप्त करण्यासाठी रिक्वेस्ट ओटीपी येईल त्यावर क्लिक करा.
- त्यानंतर तुम्हाला मोबाईल नंबरवर आलेला ओटीपी टाका आणि त्यानंतर एक नवीन पेज उघडेल.
- तुमच्या ओळखपत्रांमध्ये तुम्हाला मोबाईल नंबर अपडेट करण्यासाठी किंवा बदलण्यासाठी तुम्ही होम पेजवर फॉर्म 8 वर क्लिक करा.
- त्यानंतर सेल्फ सिलेक्ट करा आणि सबमिट या बटणावर क्लिक करा.
- त्यानंतर ऑदर ऑप्शनवर सिलेक्ट करून लिपिक भरा आणि सबमिट करा
- त्यानंतर स्क्रीनवर तुम्हाला मतदाराचे सगळे डिटेल्स दिसतील त्यानंतर ओके या बटणावर क्लिक करा.
- नंतर दुसऱ्या क्रमांकावरील करेक्शन पर्याय निवडा.
- त्यानंतर तुमच्यासमोर फॉर्म आर्ट ओपन होईल तुमचा आधार क्रमांक मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी टाकून नेक्स्टवर क्लिक करा.
- तुम्ही प्लेस भरा आणि कॅपच्या कोड देखील टाका मग सेंट ओटीपी या बटनावर क्लिक करा.
- त्यानंतर तुमच्या मोबाईल नंबरवर एक ओटीपी प्राप्त होईल तो ओटीपी टाकून सबमिटवर क्लिक करा.
- त्यानंतर 48 तासात तुमचा मोबाईल क्रमांक तुमच्या ओळखपत्राला लिंक होईल.