आरोग्यमंत्रा | आपला दिवस आनंदात जावा असं प्रत्तेकालाच वाटत असते. आणि त्यात जर सुट्टीचा दिवस असेल तर तो यादगार बनवावा अशी बहुतांश लोकांची इच्छा असते. दिवसभरात काय काय होणार आहे हे जरी आपल्या हातात नसले तरी त्यातून आनंद कसा मिळवायचा हे आपल्या हातात असते. तुम्हाला आजचा दिवस आनंदात जावा असं वाटत असेल तर खालील गोष्टी नक्की करून पहा.
१) सकाळी लवकर उठा आणि हलका फुलका व्यायाम करा. सकाळी व्यायाम केल्याने तुम्हाला दिवसभर फ्रेश वाटेल. शक्य झाल्यास थोडावेळ ध्यान करा. ध्यानामुळे तुमच्या डोक्यातील अनावश्यक विचार निघून जातील आणि मन शांत होईल.
२) स्वतासाठी वेळ काढा. तुमच्या आवडीचे संगीत एका. किंवा एखादा दुसरा चित्रपट पहा.
३) संध्याकाळच्या वेळेत तुमच्या जुन्या मित्रांना भेटण्याचे नियोजन करा. मित्रांना भेटल्याने तुमच्या डोक्याचा ताण कमी होतो.
४) कुठेतरी फिरायला जाण्याचे नियोजन आघा. प्रवासामुळे माणूसाला ताजेतवाने वाटते.
५) चिडचिड करणे ताळा. बर्याचवेळा आपण अनावश्यक पणे रागराग करत असतो. छोट्यामोठ्या कारणावरून होणारी चिडचिड रोखता आली तर तुमचा दिवस नक्कीच आनंदात जाईल यात शंका नाही.
इतर महत्वाचे –
रविवारीच सुट्टी का असते? जाणुन घ्या
या गोष्टी करा आणि पार्टनर सोबतच्या नात्यात गोडवा आणा
हस्तमैथुन करण्याचे हे आश्चर्यकारक फायदे तुम्हाला माहिती आहेत का ?