१. मटकी पूर्ण रात्र ७ ते ८ तास भिजवून घेऊया.
२. एका सुती कापडा मध्ये मटकी मोड येई पर्यंत 5 ते 6 तास बांधून ठेऊया.
३. आता मटकी एका भांड्यामध्ये घेऊन त्यामध्ये थोडे पाणी , हळद , चवीनुसार मीठ घालून एकत्र करुन घेऊया.
४. १० मिनिट आपण ह्या मिश्रणाला शिजवून घेऊया.
आता मिसळ कट / तर्री तयार करुन घेऊ
५. गॅसवर पॅन गरम करून घेऊन त्यामध्ये तेल घालूया.
६. तेल गरम होत आले की त्यात जिरे,, मोहोरी टाकून नंतर लसूण ,आले , कढीपत्ता मंद आचेवर 3 मिनिटे परतून घेऊ.
७.आणि त्या मध्ये चिरलेला कांदा घालूया आणि नंतर ते रंग बदलेपर्यंत परतून घेऊया
८. गॅस बंद करून लसूण ,आलं , कढीपत्ता ,कांदा मिश्रण थंड करूया.
९. मिक्सर मध्ये एकदम बारीक करुन घेऊ.
१०. आता एक पॅन घेऊन,४ ते ५ मोठे चमचे तेल घेऊन गरम करूया त्याला.
११. तेल गरम झाल्यावर मिक्सर मधले मिश्रण घालुयात.
१२. मिश्रण (१० ते १२ मिनिटांपेक्षा जास्त)शिजवून घेऊ.
१३. आता हळद, लाल तिखट, काळ तिखट, मिसळ मसाला घालून 5 मिनीटेpपरतवून घेऊ.
१४. आता पाणी आणि चवीनुसार मीठ घालू.आणि ते १० ते १५ मिनिटे मस्त उकळून घेऊ.
१५. मिसळ तर्री तयार आहे
१७. आता कोळसा गॅसवर गरम करायला ठेवू .
१८. आता मातीचे भांडे घेऊन, प्रथम फरसाण घालूया, नंतर मटकी , बारीक चिरलेली कांदा, कोथिंबीरआणि फरसाण घेऊयात.कोळसा गरम झाल्यावर तो स्टील वाटीत / लहान मातीच्या पणतीमध्ये घेऊ . आत कोळसा ठेवून त्यात 2 चमचे तेल घालुयात.झाकण बंद करू.
१९. 2 मिनिटांत झाकण काढू . कोळसा बाहेर काढून त्यामध्ये मिसळ कट घालूया आणि तंदूर मिसळ तयार आहे.