हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्या उन्हाळा (Summer Season) सुरु असून कडक उन्हामुळे अंगाची अक्षरशः लाही लाही होऊ लागलीय. घरी असलं तरी उन्हाच्या कडाक्याचा फटका सर्वानाच बसतोय. तुमच्यापैकी अनेकांच्या घरी AC नसेल, किंवा कधी कधी अचानक लाईट गेली तर AC आणि फॅन आपोआप बंद पडतात. अशावेळी गर्मीचा सामना करणं खूपच कठीण राहत. सध्या मार्च महिना संपत आलाय, अजून एप्रिल आणि मे या २ महिन्यांचा सामना आपल्याला करावा लागणार आहे. त्यामुळे AC नसला तरी तुमच्या घराला एकदम थंडा थंडा- कुल कुल कस ठेवता येईल? घरात गारवा खेळत राहण्यासाठी काय करावं लागेल? त्याचीच माहिती आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
तुमच्या घराभोवती झाडे लावा…. यामुळे तुम्हाला नैसर्गिक हवा मिळेल.
जर तुमच्या घरात AC ची सुविधा नसेल तर बाथरूम आणि स्वयंपाकघरातील एक्झॉस्ट फॅन चालू ठेवा. यामुळे उष्णता कमी होईल. एक्झॉस्ट फॅन उन्हाळ्यात घराला सहज थंड करू शकतात. खास करून दुपारी, एक्झॉस्ट फॅन चालू केल्याने आतून गरम हवा बाहेर पडते.
तुमच्या घराच्या खिडकीसमोर टेबल फॅन ठेवा. त्यामुळे तुमच्या घरात थंड हवा वाहेल. टेबल फॅन समोर बर्फ ठेवा..म्हणजे घरात गार गार हवा पसरेल.
तुम्ही तुमच्या टेरेसवर पाणी शिंपडू शकता… छतावर पाणी शिंपडल्याने छत थंड राहील
उन्हाळ्याच्या दिवसात, तुम्ही तुमच्या घराच्या खिडक्या आणि दरवाजे या पडद्यांनी झाकू शकता, ज्यामुळे घर थंड राहील. जास्त सूर्यप्रकाश घराला उष्णता देऊ शकतो, म्हणून उन्हाळ्यात घर थंड ठेवण्यासाठी जास्त सूर्यप्रकाश आत येऊ देऊ नका.
ओव्हन, ग्रिलिंग मशीन किंवा उष्णता निर्माण करणारे कोणतेही स्वयंपाकघरातील वस्तू दुपारच्या काळात वापरू नका
तुमचे घर थंड ठेवण्यासाठी क्रॉस व्हेंटिलेशनची देखील काळजी घ्या. यासाठी, खिडक्या उघड्या ठेवा, जेणेकरून थंड वारा खोलीत येऊ शकेल. उन्हाळ्यात खिडक्या उघडण्याची वेळ सकाळी ५.०० ते ८.०० आणि संध्याकाळी ७.०० ते १०.०० या वेळेत असते. या काळात थंड वारे वाहतात.