घरात वाढल्या असतील पाली तर ‘हे’ करा उपाय; घरात एकही पाल दिसणार नाही

0
180
how to remove lizard from home
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | आपले घर स्वच्छ साफ आणि निर्मळ असावे असे प्रत्येकाचे स्वप्न असते. पण हे सोपे नाही. व्यस्त जीवनशैली आणि इतर कामांमुळे घराची साफसफाई व्यवस्थित ठेवता येत नाही. यामुळे घरातील काही जागांमध्ये घाण आणि पाली सोबतच इतर किडे दिसायला लागतात. यामुळे आपले घर घाण आणि अस्वच्छ दिसू लागते. हे टाळण्यासाठी आम्ही तुम्हाला काही उपाय सांगणार आहोत. हे केल्याने आपल्या घरातील पालींचा नायनाट होणार आहे. जाणून घेऊ या उपायांबद्दल.

घरातील पालिंना हाऊस जीकोर्स असे म्हटले जाते. हे बिनविषारी कीटक आहेत. पण यांच्या वास्तव्याने घरातील व्यक्तींना हे खूप त्रास देऊ शकतात. एकदा का हे घरात घुसले की, लवकर घरातून बाहेर निघत नाहीत. यामुळे या पालिंना जितके लवकर होईल तितके घरातून बाहेर काढले पाहिजे. हे आपल्या आणि आपल्या घरासाठी चांगले असणार आहे. घरातून पाली पासून सुटका करून घेण्यासाठी काही घरेलू उपाय आहेत. ज्यामध्ये त्यांना न मारता त्यांना घरातून पळवले जाऊ शकते. यासाठी काळी मिरचीचा स्प्रे वापरता येऊ शकतो. काळया मिरचीचा स्प्रे पलींना त्रास होतो. त्यामुळे पाली राहणाऱ्या जागेत हे शिंपडल्यास पाली तेथे राहणार नाहीत.

अंड्याचे टरफलेसुद्धा पाली पळवण्यासाठी खूप उपयुक्त आहेत. अंडे सोलून झाल्यानंतर हे टरफले कपड्याने व्यवस्थित पूसावे आणि पाली सतत असणाऱ्या जागेवरती हे ठेवावे. अंड्यातून येणाऱ्या वासाला पाली फार घाबरतात. यामुळे त्या या जागेत येणार नाहीत. या सोबतच या जागेत कांदा लसूण ठेवल्यास त्याच्या वासानेही पाली पळून जातात. जर या उपायानेही पाली गेल्या नाहीत तर, नेफथलीन गोळ्यांचा वापरही करता येऊ शकतो. पाली आणि उंदीर असणाऱ्या जागेत या गोळ्या ठेवल्यास त्यातून येणाऱ्या वासामुळे पाली आणि उंदीर त्याठिकाणी येणार नाहीत. यातून आपले घर स्वच्छ, सुंदर आणि सुरक्षित होऊ शकेल.

इतर महत्वाच्या बातम्या –

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here