एखाद्याचे लोकेशन ट्रॅक करायचंय? या App चा करू शकता वापर

Location Track
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | आजकाल प्रत्येकाकडे मोबाईल आहे. मोबाईल हे प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्याचा एक महत्वाचा भाग आहे. त्यामुळे संपूर्ण जग एका मुठीत सामावले आहे. यामुळे घरबसल्या तुम्ही खरेदी – विक्री करू शकता. तसेच घर बसल्या तुम्ही अमेरिकेतील व्यक्तीला पाहिजे शकता. त्यामुळे सर्वजण मोबाईलचा वापर हा प्रचंड करतात. त्यातच लोकेशन ट्रॅक करण्याचा पर्याय उपलब्ध झाला आहे. परंतु तुम्हाला माहितीये का तुम्ही मोबाईल क्रमांकावरून एखाद्याचे लोकेशन ट्रॅक करू शकता. ते कसे ते पाहू.

स्पाय ऍपचा वापर करता येतो

एखाद्या व्यक्तीचे लोकेशन ट्रॅक करण्यासाठी अनेकजण स्पाय ऍपचा वापर करतात. परंतु अश्यापद्धतीने लोकेशन ट्रॅक करणे हे बेकायदेशीर मानले जाते.

कॉलर आयडीचा वापर करून ट्रॅक करता येते लोकेशन

कॉलर आयडीचा वापर करूनही लोकेशन हॅक करता येते. परंतु, येथे लाईव्ह लोकेशन मिळत नाही मात्र सदर परिसराची माहिती मिळू शकते. यासारखे इतर ऍपदेखील आहेत. मात्र या ऍपवरती डोळे झाकून विश्वास ठेवणे धोक्याचे ठरू शकते.

तुम्हीही आहात का सायबर फ्रॉडचे शिकार?

एखाद्याचे लोकेशन ट्रॅक करण्यासाठी विविध थिर्ड पार्टी ऍपचा वापर केला जातो. त्यासाठी आपल्या मोबाईलवरती विविध जाहिरातीही येत असतात. अनेकजण त्याचा वापर करतात आणि थर्ड पार्टी ऍपचा वापर करतात. परंतु तुम्ही जर सतत यासारख्या ऍपचा वापर करत असाल तर तुम्ही सायबर फ्रॉडचा शिकार बनले असण्याची शक्यता आहे. तसेच या ऍपमुळे तुमचा फोन हॅक केला जाऊ शकतो.

सर्व्हिलान्सवरून करता येते लोकेशन ट्रॅक

साधारणपणे लोकेशन ट्रॅक करण्यासाठी पोलीस आणि सुरक्षा दलाकडे त्याचा एक्सेस असतो. तो एक्सेस घेऊन सर्व्हिलान्सवर मोबाईल क्रमांक लावावा लागतो. त्यानंतर तुमचे सिम ऍक्टिव्हेट झाल्यानंतर पोलिसांना त्याची माहिती मिळते. याचा वापर पोलीस आणि सुरक्षा दल करतात.