हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यातील 12 वीची परीक्षा (HSC Exam) देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. आजपासून उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या परीक्षेचे हॉल तिकीट (Hall Ticket) विद्यार्थ्यांना ऑनलाईन पद्धतीने उपलब्ध होणार आहे. बोर्डाकडूनच (Board) याबाबत माहिती देण्यात आली असून विद्यार्थ्यांनी हॉल तिकीट डाउनलोड करण्याचे आवाहन बोर्डाने केलं आहे.
आज सकाळी 11 वाजतापासून कॉलेज लॉगइन मधून हे हॉल तिकिट्स उपलब्ध असणार आहेत. याशिवाय www.mahahssscboard.in या वेबसाईटवर तुम्हाला प्रवेशपत्रं मिळू शकतं. या संदर्भात काही तांत्रिक अडचण निर्माण झाल्यास उच्च माध्यमिक शाळा/ कनिष्ठ महाविद्यालयांनी विभागीय मंडळाकडे संपर्क साधावा असं आवाहन सुद्धा बोर्डाकडून करण्यात आलं आहे.
हॉल तिकीट डाउनलोड करण्यासाठी अधिकृत वेबसाईट – http://www.mahahsscboard.in
हॉल तिकीट ऑनलाईन (Online) पध्दतीने प्रिंटींग करताना विद्यार्थ्याकडून त्यासाठी वेगळे शुल्क घेऊ नये. सदर प्रवेशपत्राची प्रिंट काढून त्यावर मुख्याध्यापकांचा/ प्राचार्यांचा शिक्का मारून स्वाक्षरी करावी अशी सूचना बोर्डाने दिली आहे.
हॉल तिकीट मध्ये विषय व माध्यम बदल असतील तर त्यांच्या दुरुस्त्या उच्च माध्यमिक कनिष्ट महाविद्यालयांनी विभागीय मंडळात जाऊन करून घ्यावयाच्या आहेत.
तसेच हॉल तिकीट वरील फोटो, स्वाक्षरी, विद्यार्थ्याचे नाव या संदर्भातील दुरुस्त्या उच्च माध्यमिक कनिष्ट महाविद्यालयांनी त्यांच्या स्तरावर करून त्यांची एक प्रत विभागीय मंडळाकडे त्वरीत पाठवायची आहे अशी सूचना बोर्डाने केली आहे.
अधिक माहितीसाठी पहा- PDF