नवी दिल्ली । Sukanya Samrudhi Yojana जर तुम्हाला तुमच्या मुलीने उच्च शिक्षण घ्यावे, तिने चांगले करिअर व्हावे आणि तिचे लग्न थाटामाटात व्हावे असे तुम्हाला वाटत असेल तर सुकन्या समृद्धी योजना तुमच्यासाठी गुंतवणुकीचा एक चांगला पर्याय आहे. या योजनेत गुंतवणूक करून तुम्ही आपल्या मुलीचे भवितव्य सुरक्षित करू शकाल. तसेच तिचे शिक्षण आणि लग्नावर होणाऱ्या अवास्तव खर्चापासून मुक्त होऊ शकाल.
7.6 टक्के व्याज मिळेल
सुकन्या समृद्धी योजनेवर 31 मार्च, 2022 पर्यंत 7.6 टक्के दराने व्याज मिळत आहे. 10 वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलींसाठी सुकन्या समृद्धी योजना (Sukanya Samrudhi Yojana) अंतर्गत खाते उघडले जाऊ शकते. केंद्र सरकारच्या छोट्या बचत योजनांपैकी ही एक योजना आहे. हे बेटी बचाओ-बेटी पढाओ योजनेंतर्गत सुरू करण्यात आली होती. लहान बचत योजनांमध्ये सुकन्या समृद्धी ही सर्वोत्तम व्याजदर असणारी योजना आहे.
खाते कसे आणि कुठे उघडले जाईल ?
सुकन्या समृद्धी योजनेंतर्गत (Sukanya Samrudhi Yojana)मुलीचे खाते 10 वर्षापूर्वी सरकारी बँक किंवा पोस्ट ऑफिसमध्ये किमान 250 रुपये जमा करून उघडता येते. या योजनेअंतर्गत कोणतीही व्यक्ती आपल्या दोन मुलींसाठी खाते उघडू शकते. वयाच्या 21व्या वर्षी मुली या खात्यातून पैसे काढू शकतात. या योजनेत 9 वर्षे 4 महिन्यांत सध्याच्या 7.6 टक्के दराने रक्कम दुप्पट होईल.
तुम्ही किती गुंतवणूक करू शकता ?
Sukanya Samrudhi Yojana अंतर्गत, तुम्ही वर्षाला जास्तीत जास्त 1.5 लाख रुपये जमा करू शकता. म्हणजेच या योजनेत तुम्ही दरमहा 12,500 रुपयांपर्यंत गुंतवणूक करू शकता. तुम्ही एकरकमी किंवा दर महिन्याला किंवा तुम्हाला पाहिजे तितके पैसे जमा करू शकता, मात्र एकूण वार्षिक गुंतवणुकीची रक्कम रु. 1.5 लाखांपेक्षा जास्त नसावी.
मॅच्युरिटीवर तुम्हाला 65 लाख रुपये मिळतील
जर तुम्ही तुमच्या मुलीच्या जन्माच्या एका वर्षाच्या आत या योजनेत गुंतवणूक करण्यास सुरुवात केली तर तुम्हाला मॅच्युरिटीवर मोठी रक्कम मिळू शकते. तुम्ही 1.5 लाख रुपये प्रतिवर्ष किंवा 12,500 रुपये प्रति महिना किंवा रुपये 416 ची कमाल मर्यादा गुंतवल्यास, तुम्हाला तुमच्या मुलीसाठी 7.6 टक्के वार्षिक चक्रवाढ व्याजाने मॅच्युरिटीवर 65 लाख रुपये मिळतील.
किती दिवस खाते चालू ठेवता येते ?
Sukanya Samrudhi Yojana खाते उघडल्यानंतर, मुलगी 21 वर्षांची होईपर्यंत किंवा 18 वर्षांची झाल्यानंतर तिचे लग्न होईपर्यंत ते सुरू ठेवता येते.
अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या :https://pmmodiyojana.in/sukanya-samriddhi-yojana/
हे पण वाचा :
FD मध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी ‘या’ गोष्टी लक्षात ठेवा
PNB ने ग्राहकांना दिला धक्का, आता पेट्रोल-डिझेलच्या डिजिटल पेमेंटवर मिळणार नाही कोणतीही सूट !!!
Post Office मध्ये खातेदारांसाठी ‘हा’ नंबर आहे खूप महत्वाचा !!!