Samsung Galaxy S21 SE फोनवर मिळतोय जबरदस्त डिस्काउंट, जाणून घ्या किंमत अन फिचर्स

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Samsung Galaxy S21 SE : सध्या बाजारात अनेक नवनवीन स्मार्टफोन दाखल होत आहेत. अशातच आता Samsung Galaxy S21 SE फोन पुन्हा एकदा कमी किंमतीत उपलब्ध झाला आहे. फ्लिपकार्ट वर सॅमसंगचा हा मिड-रेंज प्रीमियम 5G फोन 39,999 रुपयांच्या प्रारंभिक किंमतीवर विकला जातो आहे. हे लक्षात घ्या कि, ही किंमत 128 GB स्टोरेज असलेल्या व्हेरिएंटची आहे. मात्र या फोनवर बँकेची कोणतीही ऑफर उपलब्ध नाही. मात्र तरी एक्सचेंज ऑफरच्या मदतीने ग्राहकांना त्याची किंमत आणखी कमी करता येऊ शकेल.

Buy Samsung Galaxy S21 FE 5G Phone | Samsung UK | Samsung UK

Samsung Galaxy S21 SE हा स्मार्टफोन भारतात 49,999 रुपयांच्या किंमतीवर लॉन्च करण्यात आला होता. मात्र ई-कॉमर्स वेबसाइटवर ग्राहकांना यावर 10,000 रुपयांची सूट मिळत आहे. तसेच या ऑफरवर कोणत्याही अटी किंवा नियम नाहीत. फ्लिपकार्ट कडून या सॅमसंग स्मार्टफोनवर फ्लॅट डिस्काउंट दिला जातो आहे.

दरम्यान, एका लीक झालेल्या बातमीमध्ये असा दावा केला जातो आहे की, यावर्षी Galaxy A74 लाँच करण्याची कंपनीची कोणतीही योजना नाही आणि सॅमसंग याला Galaxy S22 FE म्हणून लाँच करू शकते. मात्र, ग्राहक या फोनच्या नवीन व्हर्जनची तुलना जुन्या मॉडेलशी करू शकतील.

Samsung Galaxy S21 FE 5G Price In India & Mobile Specs IN | MobGsm

किंमत जाणून घ्या

एका मीडिया रिपोर्ट्समध्ये दावा केला जात आहे की, याची किंमत Galaxy A73 इतकीच असेल. जर असे झाले तर भारतात Galaxy S22 FE ची किंमत सुमारे 41,999 रुपये असू शकते. हे लक्षात घ्या कि, काही देशांमध्ये Galaxy S21 FE हा फोन 49,999 रुपयांमध्ये उपलब्ध करण्यात आला आहे.

फीचर्स विषयी जाणून घ्या

टिपस्टरच्या मते, हा नवीन फोन सॅमसंगच्या नवीन प्रोसेसरसह लॉन्च केला जाऊ शकतो. तसेच हा स्मार्टफोन Exynos 2300 4nm चिपसेटमध्ये सादर केला जाऊ शकतो. हे लक्षात घ्या कि, फेब्रुवारी 2023 मध्ये हा फोन लॉन्च केला जाण्याची शक्यता वर्तवण्यात येते आहे.

Mua Galaxy S21 FE 5G Mới | Giá & Ưu Đãi | Samsung VN

108MP कॅमेरा सेन्सर उपलब्ध

या Samsung Galaxy S21 SE स्मार्टफोनमध्ये नवीन कॅमेरा सेन्सर वापरला जाण्याची शक्यता आहे. तसेच यामध्ये Samsung 108MP HM6 कॅमेरा दिला जाऊ शकेल. सध्याच्या Galaxy S21 FE शी तुलना केल्यास, Galaxy S21 FE फोनमध्ये 12MP कॅमेरासह येतो. अशा परिस्थितीत, Galaxy S22 FE हँडसेटचा संभाव्य 108MP कॅमेरा हा एक जबरदस्त अपग्रेड आहे.

अधिक माहितीसाठी ‘या’ वेबसाईटला भेट द्या :  https://www.flipkart.com/samsung-galaxy-s21-fe-5g-lavender-128-gb/p/itm3b094762fb621

हे पण वाचा :
Poco C50 : अवघ्या 6,499 रुपयांच्या ‘या’ स्मार्टफोनमध्ये मिळवा जबरदस्त फीचर्स
Fixed Deposits : खुशखबर !!! ‘या’ NBFC कंपनीकडून FD वर 9.36% पर्यंत व्याज मिळवण्याची संधी
Indian Bank कडून ग्राहकांना धक्का, बँकेने कर्जावरील व्याजदरात केली वाढ
Multibagger Stock : गेल्या 23 वर्षांत ‘या’ कंपनीच्या शेअर्सने गुंतवणूकदारांवर पाडला पैशांचा पाऊस
Money Laundering म्हणजे काय ??? याद्वारे काळा पैसा पांढरा कसा केला जातो हे समजून घ्या