हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| सर्वसामान्यांना दिलासा देणारी एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. 1 जानेवारी अगोदरच एलपीजी सिलेंडरच्या दरात कपात झाली आहे. आज पासून म्हणजेच 22 डिसेंबर पासून दिल्ली ते पटनापर्यंत एलपीजी सिलेंडरचे दर 30 रुपये 50 पैशांनी स्वस्त झाले आहेत. मात्र ही कपात केवळ 19 किलोच्या व्यवसायिक सिलेंडर यांसाठीच असणार आहे. तसेच घरगुती गॅसच्या दरात कोणतेही बदल करण्यात आलेले नाही.
समोर आलेल्या माहितीनुसार, 22 डिसेंबरपासून दिल्लीत इंडेन कमर्शियल सिलिंडर 1756 रुपयांना मिळणार आहे. याआधी या गॅसची किंमत 1796.50 रुपये अशी होती. तर कोलकातामध्ये व्यावसायिक गॅस सिलेंडरचा दर 1868.50 रुपये, मुंबईत मुंबईत व्यावसायिक गॅस सिलिंडरचा दर 1710 रुपये झाला आहे. गेल्या एक डिसेंबरपासून कमर्शियल एलपीजी सिलिंडरच्या दरात वाढ झाली होती. त्यामुळे व्यावसायिकांना याचा मोठा फटका बसत होता.
मुख्य म्हणजे, याआधी देखील म्हणजे 16 नोव्हेंबर रोजी 19 किलो वजनाच्या सिलेंडरच्या दरात शंभर रुपयांहून अधिक वाढ करण्यात आली होती. यावेळी 14.2 किलो वजनाच्या एलपीजी सिलेंडरच्या दरात कोणतेही बदल झालेला नाही. तसेच घरगुती गॅस सिलेंडरच्या दारामध्ये देखील कपात करण्यात आलेली नाही. यापूर्वी 30 ऑगस्ट रोजी घरगुती गॅसच्या दरात दोनशे रुपयांची कपात करण्यात आली होती. त्यानंतर या गॅस सिलेंडरच्या दरात कोणतेही बदल करण्यात आलेले नाही. त्यामुळे आता थेट 1 जानेवारी रोजी गॅस सिलेंडरच्या दरात कपात होईल अशी शक्यता वर्तवली जात आहे.