आधी दगडफेक, लाठीचार्ज आणि गोळीबार; नमाज अदा केल्यानंतर मशिदीसमोर उडाला मोठा गोंधळ

Prayagraj
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

लखनऊ : वृत्तसंस्था – मोहम्मद पैगंबरांविरोधात भाजपच्या माजी प्रवक्त्या नुपूर शर्माच्या वक्तव्याविरोधात उत्तर प्रदेशातील मुस्लीम समुदायाने विविध ठिकाणी आंदोलन केलं आहे. प्रयागराज (Prayagraj),लखनऊ, मुरादाबाद आणि सहारनपूरमध्ये याच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. यामुळे प्रयागराजमध्ये (Prayagraj)परिस्थिती अधिक बिघडली आहे.

काय घडले नेमके ?
प्रयागराजमधील (Prayagraj)अटाला येथे जुमेच्या नमाजानंतर घोषणाबाजी झाली. पोलिसांनी थांबवण्याचा प्रयत्न केला होता, मात्र त्याचवेळी दगडफेक सुरू झाली. पोलिसांनी लाठीहल्ला करून उपद्रव करणाऱ्या लोकांना ताब्यात घेतले मात्र त्यानंतरही उपद्रवी शांत झाले नाही. त्यामुळे पोलिसांना नाईलाजास्तव अश्रुधुराच्या नळकांड्या फोडाव्या लागल्या तसेच हवेत गोळीबार करावा लागला. या दगडफेकीत आयजी राकेश सिंह यांच्यासोबत अनेक पोलीस जखमी झाले आहेत.

यानंतर प्रयागराजमध्ये (Prayagraj) डीएम संजय कुमार खत्री आणि एसएसपी अजय कुमार हे देखील शुक्रवारच्या नमाजपूर्वी चौक जामा मशिदीबाहेर पोहोचले आणि लोकांना शांततेच आवाहन केलं. शुक्रवारच्या नमाजानंतर पोलिसांच्या सतर्कतेनंतरही अटाळा चौक आणि आजूबाजूच्या रस्त्यावर उपस्थित अल्पवयीन मुलांना धक्काबुक्की करून गोंधळ घालण्यात आला. शेकडोंच्या संख्येमध्ये पोहोचलेल्या लोकांनी नुपूर शर्माला फाशी देण्याची मागणी केली आहे. यावेळी वातावरण चिघळवणाऱ्या 6 ते 7 हल्लेखोरांना पोलिसांनी ताब्यात घेतले.

हे पण वाचा :
4 वर्षांच्या चिमुरड्यासोबत अनैसर्गिक कृत्य केल्याने जमावाकडून नराधमाला बेदम मारहाण

बुलेट मिळाली : महाराष्ट्र केसरी “पृथ्वीराजला” छ. उदयनराजे भोसले यांच्याकडून प्रदान

कौतुकास्पद ! कोल्हापूरच्या ऐश्वर्या जाधवची विम्बल्डन स्पर्धेसाठी आशियाई संघात निवड

kotak mahindra bank ने आपल्या बचत खाते आणि FD वरील व्याजदरात केली वाढ !!!

ICICI Bank च्या कर्जावरील व्याज दरात वाढ , EMI देखील महागले