Kotak Mahindra Bank ने आपल्या बचत खाते आणि FD वरील व्याजदरात केली वाढ !!!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Kotak Mahindra Bank :RBI कडून गेल्या महिन्याभरात रेपो दरात दोन वेळा वाढ करण्यात आली आहे. यानंतर एकीकडे बँकांच्या कर्जावरील व्याजदर वाढले तर दुसरीकडे फिक्स्ड डिपॉझिट्सवरील व्याजदरातही वाढ केली गेली आहे. यामध्ये आता कोटक महिंद्रा बँकेने देखील आपल्या सेव्हिंग अकाउंट आणि फिक्स्ड डिपॉझिट्सवरील (FD) व्याजदरात वाढ करण्याची घोषणा केली आहे.

बचत खात्यासाठी 13 जूनपासून नवीन व्याजदर लागू होणार

बँकेकडून आता 50 लाखांपेक्षा जास्त डिपॉझिट्स असलेल्या बचत खात्यांवरील व्याजदर 3.5 टक्क्यांवरून 4 टक्के करण्यात आला आहे. 13 जून 2022 पासून हा नवीन व्याजदर लागू करण्यात येणार आहे. यामुळे गुंतवणूकदारांना मोठा फायदा होणार आहे. Kotak Mahindra Bank ने आता 50 लाखांपेक्षा कमी डिपॉझिट्स असलेल्या बचत खात्यांवरील व्याजदरात कोणताही बदल केलेला नाही. तो सध्याच्या 3.5 टक्क्यांवर कायम आहे.

Kotak Mahindra Bank Q3 consolidated PBT rises 6.3% | Business Standard News

FD साठी10 जूनपासून नवीन व्याजदर लागू होणार

Kotak Mahindra Bank ने आपल्या फिक्स्ड डिपॉझिट्सवरील व्याजदरात 10 ते 15 बेस पॉईंट्सने वाढ केली आहे म्हणजेच त्यामध्ये 0.10 टक्क्यांवरून 0.15 टक्के वाढ झाली आहे. 10 जून 2022 पासून बँकेचे हे नवीन व्याजदर लागू होतील. आता बँकेकडून 1 वर्षापेक्षा जास्त कालावधीसाठी आणि 2 कोटी रुपयांपेक्षा कमी फिक्स्ड डिपॉझिट्सवरील व्याजदरातही वाढ केली गेली आहे. Kotak Mahindra Bankकडून 365 दिवस ते 389 दिवसांच्या FD वरील व्याजदर आता 5.40 टक्क्यांवरून 5.50 टक्के करण्यात आला आहे. तर, 390 दिवसांच्या फिक्स्ड डिपॉझिट्सवरील व्याजदर 5.5 टक्क्यांवरून 5.65 टक्के करण्यात आला आहे.

Fixed Deposit (FD): If you are planning to get FD, then keep these 5 things  in mind including laddering and short term FD, it will benefit more -  Business League

1 वर्षाच्या कालावधीत कोणताही बदल झालेला नाही

Kotak Mahindra Bank ने 23 महिने ते 3 वर्षांपेक्षा कमी कालावधीच्या FD वरील व्याजदर हा सध्याच्या 5.6 टक्क्यांवरून 5.75 टक्क्यांपर्यंत वाढवला आहे. त्याच वेळी, 3 वर्षांपेक्षा जास्त कालावधी असलेल्या 10 वर्षांपर्यंतच्या डिपॉझिट्सवर आता 5.75 टक्क्यांऐवजी 5.9 टक्के व्याज दिले जाईल. 1 वर्षाच्या फिक्स्ड डिपॉझिट्सवरील व्याजदर 5.25 वर आहे तोच ठेवण्यात आलेला आहे. त्याचप्रमाणे, 180 दिवस ते 363 दिवसांच्या कालावधीसाठी सध्याचा व्याज दर 4.75 टक्के असेल. इथे हे लक्षात घ्या कि, ज्येष्ठ नागरिकांना पूर्वीप्रमाणेच 0.5 टक्के जास्त व्याज मिळत राहील.

8 जून 2022 रोजी RBI चे गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी रेपो दरात 50 बेस पॉईंट्सची वाढ केल्याची घोषणा केली. त्यानंतर तो 4.40 टक्क्यांवरून 4.90 टक्क्यांवर आला. या देखील 4 मे 2022 रोजी मध्यवर्ती RBI कडून रेपो दर 4.00 टक्क्यांवरून 40 बेस पॉईंट्सने वाढवून 4.40 टक्क्यांवर आणला होता.

Kotak Mahindra Bank divests 10 pc stake in ECA Trading Services to its arm  | The Financial Express

अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://www.kotak.com/en/rates/interest-rates.html

हे पण वाचा :

ICICI Bank च्या कर्जावरील व्याज दरात वाढ , EMI देखील महागले

Multibagger Stocks: ‘या’ 4 आयटी स्टॉक्सने 1 वर्षात गुंतवणूकदारांना दिला दुप्पट रिटर्न !!!

Credit Card चा पुरेपूर फायदा कसा घ्यावा हे जाणून घ्या !!!

Business ideas : पांढर्‍या चंदनाची लागवड करून मिळवा भरपूर पैसे !!!

RBL Bank च्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी, बँकेने FD दरात केला बदल !!!

Leave a Comment