पत्नीचे प्रियकरासोबतचे फोटो पाहून पतीने केले सपासप वार

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कल्याण प्रतिनिधी | पत्नीचे लग्नाआधीच्या प्रियकरासोबतचे फोटो पाहून संतापलेल्या पतीने पत्नीवर वार केल्याची घटना कल्याणमध्ये घडली आहे. या हल्ल्यात पत्नी गंभीर जखमी झाली असून तिला उपचारासाठी मुंबईतील खासगी रुग्णालयात दाखल केले आहे. तर पतीला पोलिसांनी अटक केली आहे.

‘या’ मतदारसंघात शिवसेनेचा होऊ शकतो ‘धक्कादायक’ पराभव

काजल शिगवण असे पिडीत महिलेचे नाव असून विकास शिगवण असे आरोपी पतीचे नाव आहे. हे पतीपत्नी कल्याण येथील मोहने भागात राहतात. दोघांमध्ये सतत वाद होत असल्याने काजल आपल्या जोशी बागेतील माहेरी राहण्यास गेली होती.

महाराष्ट्रातील ‘या’ जागेचा निकाल लागणार सर्वात आधी

माहेरी असणाऱ्या पत्नीचे लग्नाच्या आधी अनैतिक संबंध असल्याचे विकासला असे समजले. त्यानंतर त्याला या  संदर्भातील फोटो देखील मिळाले. फोटो पाहून राग अनावर झालेल्या विकासने पत्नीच्या माहेरी धाव घेतली. पत्नी स्व:ताच्या साडेतीन वर्षांच्या मुलीसोबत बसली असता. मागच्या दरवाजाने घरात घुसून सपासप वार केले. यात पत्नी गंभीर जखमी झाली आहे.

Leave a Comment