सातारा | जावळी तालुक्यातील मेढा या ठिकाणी बिहारमधील एका अल्पवयीन गरोदर विवाहितीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना रविवारी घडली आहे. याप्रकरणी विवाहितेचा पती महंमद आझाद जासीम (वय- 22) यास पोलिसांनी अटक केली आहे. या घटनेची मेढा पोलीस स्थानकात नोंद करण्यात आली आहे.
याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, महंमद आझाद जासीम (वय- 22, मूळ गाव- गंगोली ता. विभूतीपुर, जि. समस्तीपूर) या बिहार राज्यातील युवकाने अल्पवयीन मुलीस फूस लावून लग्नाचे आमिष दाखवून मेढा याठिकाणी पळवून आणून तिच्यासोबत लग्न केले होते. तसेच तिच्यावर वारंवार त्याच्याकडून अत्याचार करण्यात आले असून ती दोन महिन्याची गरोदर राहिली होती.
संशयित तिच्यासोबत सतत भांडण, तंटा करीत तिचा छळ करण्यात आला. या सर्व जाचाला कंटाळून तिने मेढा याठिकणी भाड्याच्या घरात लोखंडी पत्राच्या अँगलला ओढणीने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. याबाबत अल्पवयीन मुलीच्या भाऊ राहुल अमरजित राय (वय- 24) याने मेढा पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दाखल केली आहे.अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक अमोल माने करीत आहेत.




