घर रिकामे करण्याच्या वादातून पतीचा पत्नीवर चाकूहल्ला

crime
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

औरंगाबाद – घर रिकामे करण्याच्या वादावरून पतीने पत्नीला बेदम मारहाण करत चाकू हल्ला केल्याची घटना शहरातील रमानगरात उघडकीस आली आहे. या विवाहितेला घाटीत दाखल करण्यात आले असून, तिची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली. या प्रकरणी उस्मानपुरा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

उस्मानपुरा भागातील रमानगरातील रमेश शिरसाठ या कंपनीतील कामगार आहे. गल्लीत बदनामी होत असल्याने त्याने शुक्रवारी सायंकाळी पत्नी सत्यवर्ति शिरसाट (38) हिला खोली रिकामी करण्याचे सांगितले. यावर दोघा पती-पत्नीत जोरदार भांडण झाले. त्यातच रागाच्या भरात रमेशने पत्नी सत्यवर्तिला मारहाण करत चाकूने सपासप वार केले. पोटात आणि मांडीवर वार केल्याने सत्यमूर्ति रक्ताच्या थारोळ्यात पडली. तिला उपचारासाठी घाटीत दाखल करण्यात आले आहे.

या भांडणात रमेश शिरसाट हा देखील जखमी झाला असून, त्याच्यावर देखील घाटीत उपचार सुरू आहेत. सहाय्यक फौजदार उपेंद्र कुत्तूर हे या प्रकरणी अधिक तपास करत आहेत.