….तर आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा देईन; विजय वडेट्टीवारांचे मोठे विधान

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । ओबीसींच्या राजकीय आरक्षणाच्यामुद्द्यावरुन सध्या महाविकास आघाडी व भाजपमध्ये एकमेकांवर निशाणा साधला जात आहे. या दरम्यान मंत्री विजय वडेट्टीवार यांनी केंद्र सरकावर गंभीर आरोप केला आहे. ओबीसी आरक्षणाचा कुणी बळी घेतला असेल तर तो केंद्रातील भाजप सरकारने घेतला आहे, अशी टीका वडेट्टीवार यांनी केली आहे. तसेच ओबीसी समाजासाठी मी आहे आणि त्यासाठी मला समाज महत्त्वाचा असून त्यासाठी वेळ पडली तर मी मंत्रिपद सोडेन, असे महत्वाचे विधानही त्यांनी ओबीसी आरक्षणाच्या मुद्यांवरून केले आहे.

बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव येथे नुकताच एक कार्यक्रम पार पडला. याप्रसंगी वडेट्टीवार म्हणाले की, काही जनांनी ‘मी पुन्हा येईल, मी पुन्हा येईल म्हटले होते. त्यांना मी सांगू इच्छितो कि कुणीही कायमचे सत्तेसाठी आलेले नसतात. ओबीसी समाजासाठी मी आहे आणि त्यासाठी मला समाज महत्त्वाचा आहे. वेळ पडली तर मी मंत्रिपद देखील सोडू शकतो. जर राज्य सरकारकडून ओबीसींवर अन्याय झाला तर मी काय करावे? हे मुख्यमंत्री यांना विचाराव लागेल, असेही यावेळी वडेट्टीवार यांनी सांगितले.

ओबीसी आरक्षणप्रश्नी नुकत्याच झालेल्या अधिवेशनात ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरुन येत्या 21 डिसेंबर रोजी होणाऱ्या निवडणुका पुढे ढकलण्याची मागणी राज्य सरकारने केली होती. मात्र, निवडणूक आयोगाने राज्य सरकारचा हा प्रस्ताव नाकारला आहे. निवडणुका निश्चित वेळेनुसारच होणार असल्याचे आयोगाने म्हंटले आहे. ओबीसी आरक्षित जागांवर स्थगित झालेली निवडणूक 18 जानेवारी रोजी होणार आहेत.