व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Take a fresh look at your lifestyle.

पुण्यात ट्रॅव्हल्स चालकाने विवाहित महिलेला पळवून नेत तिच्यासोबत केले ‘हे’ धक्कादायक कृत्य

पुणे : हॅलो महाराष्ट्र – पुण्यामध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये ट्रॅव्हल्स चालकाने स्वारगेट परिसरातुन पीडित महिलेचे अपहरण करून तिच्यावर दोनवेळा बलात्कार (Rape) केला आहे. या आरोपी ट्रॅव्हल्स चालकाला स्वारगेट पोलिसांनी अटक केली आहे. नवनाथ शिवाजी भोग असे आरोपी बस चालकाचे नाव आहे. या प्रकरणी स्वारगेट पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

काय घडले नेमके ?
पीडित महिला काम शोधण्यासाठी आपल्या पतीसोबत वाशिम वरून प्रवास करत पुण्यात आली होती. रात्री 11 वाजण्याच्या सुमारास स्वारगेट ST स्टँड परिसरात झोपण्यासाठी जागा शोधत होते. तेवढ्यात ट्रॅव्हल्स बस चालक आरोपी नवनाथ शिवाजी भोग याने रतीकांत बंदीचोडे आणि पीडित महिलेस तुम्ही माझ्या बसमध्ये झोपा, एवढ्या रात्री कुठे जागा मिळणार,असे सांगितले. त्या आरोपीच्या बोलण्यावर विश्वास ठेवून दोघे जण बसमध्ये आराम करण्यास गेले.

यानंतर रात्रीच्या सुमारास पीडित महिलेचा पती बाथरूमसाठी गेला असता, आरोपीने काही क्षणात बस तेथून पळवून नेली आणि तू जर आरडा ओरड केल्यास तुला जीवे मारेल अशी धमकी पीडित महिलेला दिली. यानंतर आरोपीने स्वारगेटजवळ असलेल्या फुटपाथच्या बाजूला बस थांबून तिच्यावर बलात्कार (Rape) केला. त्यानंतर पुन्हा कात्रज बस स्टॉप जवळील कॅनॉल फुटपाथच्या बाजूला बस थांबून पुन्हा तिच्यावर बलात्कार (Rape) केला. त्यानंतर बसमधून पीडित महिलेस खाली उतरवले आणि आरोपी तेथून पसार झाला आहे. त्यानंतर पीडित महिला तिच्या पतीला स्वारगेट परिसरात भेटली. त्यानंतर दोघांनी पोलीस स्टेशनमध्ये जाऊन आरोपी ट्रॅव्हल्स चालकविरोधात गुन्हा दाखल केला. यानंतर पोलिसांनी तातडीने कारवाई करत आरोपीला बंगलोर हायवेवर जेरबंद केले.

हे पण वाचा :
2024 ला भाजपचे 43 खासदार अन् 170 जागा येणार; चंद्रकांत पाटलांचा दावा

Moosewala Murder Case : सौरभ महाकाळनंतर आता संतोष जाधवला पुणे पोलिसांकडून अटक

T20 World Cup मध्ये भारताचा ‘हा’ खेळाडू खेळाडू ठरू शकतो गेम चेंजर! गावसकरांची भविष्यवाणी

7 वर्षांच्या मुलीचा गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळला मृतदेह, आत्महत्या की हत्या? गूढ कायम

Cristiano Ronaldoची ‘त्या’ 13 वर्षे जुन्या खटल्यातुन निर्दोष मुक्तता