धक्कादायक! रस्ता दुभंगून अख्खा बाजारच शिरला जमिनीत

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन – राज्यात बऱ्याच ठिकाणी रस्त्याची (road) मोठ्या प्रमाणात दुरावस्था झाली आहे. या खराब रस्त्यांमुळे (road) अनेक अपघात होतात मात्र तरी देखील परिस्थिती मात्र जैसे थे. याचाच प्रत्यय देणारी एक घटना समोर आली आहे. यामध्ये हैद्राबादमधील एक रस्ता (road) अचानक खचला आणि अख्खा बाजार जमिनीत गाडला गेला. या दुर्दैवी घटनेत अनेक लोक जखमी झाले आहेत. तसेच गाड्यांचेदेखील मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

काय घडले नेमके?
हाती आलेल्या माहितीनुसार हा खचलेला रस्ता (road) एका नाल्यावर बांधण्यात आला होता. या रस्त्यावर (road) आता बाजारपेठ आहे. त्यामुळे दररोज शेकडो लोक या रस्त्यावरून चालायचे. परिणामी हळूहळू हा रस्ता खचत गेला आणि शेवटी ज्याची कोणी अपेक्षा केली नाही तेच घडले. अख्खा बाजार बघता बघता जमिनीखाली गाडला गेला. या अपघातामध्ये भाजी विक्रेत्यांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं आहे.

या अपघातानंतर प्रशासनावर मोठ्या प्रमाणात टीका केली जात आहे. गोशामहलचे आमदार राजा सिंह यांनी या अपघातासाठी क्रॉंग्रेस सरकारला जबाबदार धरलं आहे. कारण 2009 साली त्यांच्याच कार्यकालावधीत या रस्त्याची (road) बांधणी करण्यात आली होती. तसेच हा रस्ता लवकरच पुन्हा एकदा चांगल्या पद्धतीनं बांधण्यात येईल असे अश्वासन त्यांनी जनतेला दिले आहे.

हे पण वाचा :
एकनाथ शिंदे भाई आहात ना? दाखवा भाईगिरी, नाहीतर राजीनामा द्या…; संजय राऊतांचे खुले आव्हान
पाकिस्तानचा संघ विश्वचषकासाठी भारतात येणार का ? गृह मंत्रालयाने घेतला ‘हा’ मोठा निर्णय
देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे लाडके लोकप्रिय मुख्यमंत्री; शिंदेंकडून फडणवीसांचा मुख्यमंत्री असा उल्लेख
Gold ATM : आता ATM मधून निघणार सोने; बनले देशातील पहिले सोन्याचे एटीएम
ऊठ मराठ्या ऊठ ! महाराष्ट्राचा कणा मोडून मराठी स्वाभिमान संपविण्याचा खेळ सुरू झालाय; राऊतांचे ट्विट