Metro मध्ये नोकरीची संधी; काय आहे पात्रता? इथं करा अर्ज

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड, नागपूर येथे (Maha Metro Bharti 2023) विविध रिक्त पदांसाठी भरती होणार आहे. त्यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन/ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. 3 जानेवारी 2023 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.

संस्था – महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड, नागपूर

नोकरी करण्याचे ठिकाण – नागपूर, पुणे, मुंबई (महाराष्ट्र)

पद संख्या – 18 पदे

भरली जाणारी पदे आणि आवश्यक शैक्षणिक पात्रता –

१) महाव्यवस्थापक / General Manager – ०१ पद
शैक्षणिक पात्रता : ०१) शासकीय मान्यताप्राप्त संस्था / विद्यापीठातून स्थापत्य अभियांत्रिकीमध्ये पूर्ण वेळ बी.ई. / बी.टेक.किंवा बी.आर्क. ०२) १९ वर्षे अनुभव

२) वरिष्ठ उप महाव्यवस्थापक / Senior Deputy General Manager – ०१ पद
शैक्षणिक पात्रता : ०१) सीए / ICWA ०२) ११ वर्षे अनुभव

३) उप मुख्य प्रकल्प व्यवस्थापक / Deputy Chief Project Manager – ०६ पदे
शैक्षणिक पात्रता : ०१) शासकीय मान्यताप्राप्त संस्था / विद्यापीठातून इलेक्ट्रिकल अभियांत्रिकीमध्ये पूर्ण वेळ बी.ई. / बी.टेक.किंवा बी.आर्क. ०२) ०७ वर्षे अनुभव

४) व्यवस्थापक / Manager – ०४ पदे
शैक्षणिक पात्रता : ०१) शासकीय मान्यताप्राप्त संस्था / विद्यापीठातून इलेक्ट्रॉनिक्स/ इलेक्ट्रॉनिक्स आणि दूरसंचार अभियांत्रिकीमध्ये पूर्ण वेळ बी.ई. / बी.टेक.किंवा बी.आर्क. ०२) ०७ वर्षे अनुभव (Maha Metro Bharti 2023)

५) सहाय्यक व्यवस्थापक / Assistant Manager – ०१ पद
शैक्षणिक पात्रता : ०१) शासकीय मान्यताप्राप्त संस्था / विद्यापीठातून इलेक्ट्रॉनिक्स/ इलेक्ट्रॉनिक्स आणि दूरसंचार अभियांत्रिकीमध्ये पूर्ण वेळ बी.ई. / बी.टेक. ०२) ०५ वर्षे अनुभव

६) डेपो कंट्रोलर / Depot Controller – ०३ पदे
शैक्षणिक पात्रता : ०१) शासकीय मान्यताप्राप्त संस्था / विद्यापीठातून इलेक्ट्रिकल / इलेक्ट्रॉनिक्स/ इलेक्ट्रॉनिक्स आणि दूरसंचार अभियांत्रिकीमध्ये पूर्ण वेळ बी.ई. / बी.टेक. किंवा ०३ वर्षे डिप्लोमा ०२) ०२ वर्षे अनुभव

७) स्टेशन कंट्रोलर / Station Controller – ०१ पद
शैक्षणिक पात्रता : ०१) शासकीय मान्यताप्राप्त संस्था / विद्यापीठातून इलेक्ट्रिकल / इलेक्ट्रॉनिक्स/ इलेक्ट्रॉनिक्स आणि दूरसंचार अभियांत्रिकीमध्ये पूर्ण वेळ बी.ई. / बी.टेक. किंवा ०३ वर्षे डिप्लोमा ०२) ०२ वर्षे अनुभव

८) कनिष्ठ अभियंता / Junior Engineer – ०१ पद (Maha Metro Bharti 2023)
शैक्षणिक पात्रता : ०१) शासकीय मान्यताप्राप्त संस्था / विद्यापीठातून स्थापत्य अभियांत्रिकीमध्ये पूर्ण वेळ बी.ई. / बी.टेक. ०२) ०२ वर्षे अनुभव

मिळणारे वेतन –

जनरल मॅनेजर – 1,20,000/- – 2,80,000/- रुपये दरमहा
वरिष्ठ उपमहाव्यवस्थापक – 80,000-/- 2,20,000/- रुपये दरमहा
उपमुख्य प्रकल्प व्यवस्थापक – 70,000/- – 2,00,000/- रुपये दरमहा
व्यवस्थापक – 60,000/- -1,80,000/-रुपये दरमहा (Maha Metro Bharti 2023)
असिस्टंट मॅनेजर – 50,000/- – 1,60,000/-रुपये दरमहा
डेपो कंट्रोलर – 35,000/- – 1,10,000/-रुपये दरमहा
स्टेशन कंट्रोलर – 35,000/- – 1,10,000/-रुपये दरमहा
कनिष्ठ अभियंता – 33,000/- – 1,00,000/- रुपये दरमहा

परीक्षा फी – ४००/- रुपये [SC/ST/महिला – १००/- रुपये]

अर्ज पाठविण्याचा पत्ता – General Manager (HR) Maharashtra Metro Rail Corporation Ltd. Metro Bhawan, Near Dikshabhoomi, NAGPUR – 440 010.

अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF

अधिकृत वेबसाईट – www.mahametro.org

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY