Satara News : अज्ञात वाहनाच्या धडकेत तरसाचा मृत्यू; कराड- ढेबेवाडी रस्त्यावरील घटना

Hyenas died due to collision with unknown vehicle
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी । सकलेन मुलाणी
कराड तालुक्यातील कराड ढेबेवाडी रस्त्यावर विंग येथे अज्ञात वाहनाच्या धडकेने एका तरसाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. आज पहाटेच आशीर्वाद धाबा नजीक रस्त्यावर ही घटना घडली असून सदर तरस परिसरातील लोंकांच्या निदर्शनास येताच तातडीने वन विभागला याबाबत माहिती दिली. वनविभागाने सदर मृत तरसास ताब्यात घेतलं आहे.

कराड ढेबेवाडी रस्त्यावरील विंग येथील शिंदेवाडी हद्दीत आशीर्वाद धाबा नजीक रस्त्यावर हे तरस मृतावस्थेत आढळले. याबाबत राजू पाचुपते यांनी मानद वन्यजीव रक्षक रोहन भाटे यांना माहिती दिली. वनविभागाने सदर तरस ताब्यात घेतले असून धडक दिलेल्या वाहन चालकाने मात्र घटनास्थळावरून पळ काढला आहे. या घटनेचा अधिक तपास परिक्षेत्र वनाधिकारी तुषार नवले करीत आहेत.

दरम्यान, याबाबत वनपाल मलकापूर आनंद जगताप यांना विचारलं असता वाहनाने आज पहाटेच शिंदेवाडी हद्दीत तरसाला अज्ञात वाहनाची धडक बसल्याची माहिती मिळाली. त्यानंतर सदर मृत तरस ताब्यात घेतलं आहे. तसेच  तातडीने घटनास्थळी जाऊन पंचनामा करण्यात आला आहे.  या तरसाचे शवविच्छेदन करण्यात आलं असून ही धडक ताजी असल्याचे दिसत आहे. याबाबात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरु आहे असं त्यांनी म्हंटल आहे.