हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | भारतात चारचाकी वाहनांची मागणी वाढत असून अनेक कार निर्मात्या कंपन्या (Hyundai Palisade 2022) आपल्या नवनवीन गाड्या बाजारात लॉन्च करत आहेत. त्याचा पार्श्वभूमीवर ह्युंदाईची Palisade हि ७ सीटर SUV नव्या अपडेट सह लॉन्च होण्याच्या तयारीत आहे. ह्युंदाईची ही नवी SUV Kia Palisade फेसलिफ्ट आणि Kia Telluride या सारख्या गाडयांना तगडी फाईट देईल. आज आपल्या कार रिव्हिव्ह मध्ये जाणून घेऊया या गाडीचे दमदार फीचर्स …
कारची वैशिष्ट्ये आणि डिझाईन-
कंपनीच्या म्हणण्यानुसार, हि नवी SUV (Hyundai Palisade 2022) पूर्वीपेक्षा अधिक रुंद आणि मोठी आहे. Hyundai Palisade फेसलिफ्टमध्ये एक मोठा ग्रिल, LED हेडलॅम्प आणि नवीन बंपर देण्यात आले आहे. याव्यतिरिक्त Palisade SUV खालच्या पुढच्या बंपरवर तसेच बाजूच्या स्कर्टवर कॉन्ट्रास्ट इन्सर्ट देते. याशिवाय, यात नवीन स्पोक अलॉय व्हील टायर्स देखील मिळतील.
तंत्रज्ञानाच्या बाबतीत, Palisade फेसलिफ्टला Hyundai Digital Key चे फीचर्स दिले आहे ज्याद्वारे तुम्ही iPhone, Apple Watch किंवा Samsung Galaxy च्या मदतीने कार लॉक,अनलॉक आणि सुरू देखील करू शकता.
इंजिन-
कारच्या इंजिन बाबत (Hyundai Palisade 2022) बोलायचं झाल्यास, Hyundai च्या या SUV ला 3.8-लिटरचुरली-एस्पिरेटेड V6 इंजिन देण्यात आले आहे जे जास्तीत जास्त 295 PS पॉवर आणि 355 Nm टॉर्क जनरेट करेल. हे हे इंजिन 8- स्पीड ऑटोमॅटिक गिअरबॉक्ससह जोडलेले आहे.
काय असू शकते किंमत-
गाडीच्या किमतीबाबत बोलायचं झालं तर Hyundai च्या या SUV ची किंमत अंदाजे ४० लाख रुपयांपर्यंत असू शकते मात्र अद्याप याबाबत निश्तित पणे सांगता येत नाही.
हे पण वाचा :
Volvo XC40 Recharge : Volvoने लाँच केली पहिली इलेक्ट्रिक SUV; पहा किंमत आणि फीचर्स
Maruti Suzuki Grand Vitara 2022 : मारुती सुझुकीची Grand Vitara लाँच; पहा काय आहे किंमत?
Citroen C3 Launch : दमदार फीचर्ससह Citroen C3ची भारतात धमाकेदार एन्ट्री; पहा काय आहे किंमत