जळगाव प्रतिनिधी । ”अन्याय जर सहन झाला नाही तर मी मोदी साहेबांच्या सभेतही बोलायला घाबरत नाही असा आपला स्वभाव आहे. अखेर काय होईल शेवटी घरी बसू आणि तसे ही माजी आमदाराची लाख रुपये पेन्शन आहे. आपल्या गरजा फार मोठ्या नाही आणि ज्याला पेन्शन आहे त्याला काय टेंशन आहे. त्यामुळे स्पष्ट वक्ता सुखी भव असं विधान पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील केलं आहे. ते भुसावळ येथे भूमिपूजन सोहळ्या दरम्यान बोलत होते. या सोहळ्यास विधानसभेचे माजी अध्यक्ष अरुणभाई गुजराथी, खासदार रक्षा खडसे, आमदार संजय सावकारे यासह विविध पक्षाचे मान्यवर पदाधिकारी उपस्थित होते.
स्वपक्षीय असो वा बाहेरच्या पक्षाचा असो आपल्याला अन्याय सहन होत नाही. चांगलं वागणं हाच आपला धर्म असून म्हणून मी शिवसेनेचा असून सुध्दा मला ६५% मुस्लिम समाजाची मते मिळाली असं पाटील यांनी म्हटलं. आपण लोकांशी प्रेम वाटू लोक पण आपल्याला प्रेम देतात. चांगले काम करणे हे सर्व पक्षाचे कर्तव्य आहे. निवडणुकीपुरते पक्ष असतात. निवडणुकीनंतर पक्ष नसतात अशी भावना पाटील यांनी यावेळी व्यक्त केली.