मुंबई प्रतिनिधी । सत्ता स्थापनेबाबत आज झालेल्या ‘मातोश्री’वरील शिवसेना आमदारांच्या बैठकीत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी ”भाजपनेच सत्ता स्थापनेबाबत निर्णय घ्यावा , मला स्वतःहुन युती तोडायची नाही” अशी भूमिका स्पष्ट केली. लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळी जे ठरलं तेच व्हावं अशी आमची अपेक्षा आहे.
‘मातोश्री’वरील शिवसेना आमदारांच्या पार पडलेल्या बैठकीत उद्धव ठाकरे मुख्यमंत्री पदावर अजूनही ठाम असल्याचे समजते आहे राज्यातील सत्ता स्थापनेच्या घडामोडींनीं आज वेग घेतला आहे. कुठल्याही परिस्थिती मध्ये शिवसेनेचे आमदार फुटू नयेत म्हणून शिवसेनेच्या सर्व आमदारांना ‘मातोश्री’ वरील बैठक झाल्यानंतर रंगशारदा हॉटेल येथे ठेवण्यात आले आहे.