हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दुसऱ्या टी-20 मध्ये भारताने ऑस्ट्रेलियाचा 6 विकेटने धुव्वा उडवला. अंतिम ओव्हर मधील हार्दिक पांड्याच्या आक्रमक फलंदाजीच्या जोरावर भारताने ऑस्ट्रेलियाचे 195 धावांचे आव्हान पार केले. आणि मालिकाही आपल्या खिशात घातली. शिखर धवनचं अर्धशतक आणि हार्दिक पांड्या, विराट कोहलीच्या फटकेबाजीमुळे भारताने हा सामना जिंकला. या मॅचमध्ये ऑस्ट्रेलियाचा कर्णधार आणि विकेट कीपर मॅथ्यू वेड याने शिखर धवनचा स्टम्पिंग सोडला, त्यानंतर आपण धोनी नाही, असं तो म्हणाला. स्टम्प मायक्रोफोनमध्ये हा आवाज कैद झाला. वेडच्या या वक्तव्यानंतर शिखर धवन आणि कॉमेंटेटरना देखील हसू आवरता आले नाही.
महेंद्रसिंग धोनी हा सर्वात चपळ यष्टिरक्षक होता. सगळेच विकेट कीपर स्टम्पमागे धोनीच्या गतीने प्रभावित झालेले अनेकवेळा पाहायला मिळाले. यावेळी वेडनेही आपण धोनीइतके जलद नसल्याचं मान्य केलं. नवव्या ओव्हरमध्ये स्वीपसनच्या बॉलिंगवर धवन स्टम्पिंग होता होता वाचला. स्वीपसनने टाकलेल्या वाईड बॉलवर धवनने कट मारण्याचा प्रयत्न केला, पण धवनचा अंदाज चुकला आणि बॉल विकेट कीपर मॅथ्यू वेडच्या हातात गेला. या काही क्षणांच्या काळात धवनचा पाय हवेत गेला होता, पण वेडला बेल्स उडवायला वेळ लागला, ज्यामुळे शिखर धवन वाचला.
"Not Dhoni, not quick enough like Dhoni!" 😂
Live #AUSvIND: https://t.co/L1KY15FYnb pic.twitter.com/IOC7NH2xgb
— cricket.com.au (@cricketcomau) December 6, 2020
यानंतर वेड आपण धोनीएवढे जलद नसल्याचं वेड म्हणाला. धवनने या मॅचमध्ये 36 बॉलमध्ये 52 रन केले, यामध्ये 4 फोर आणि 2 सिक्सचा समावेश होता.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’