सर्वसामान्यांना धक्का! डिसेंबरमध्ये दूध, साखर आणि चहापुडी झाली महाग, रेट लिस्ट चेक करा…

नवी दिल्ली । सर्वसामान्यांना स्वयंपाकघरात महागाई सातत्याने चटका लावत आहे. भाज्या आणि डाळीनंतर आता साखर, दूध आणि चहापुडीच्या किंमतीत वाढ झाली आहे. 30 नोव्हेंबर रोजी ग्राहक मंत्रालयाच्या वेबसाइटवर दिलेल्या आकडेवारीनुसार देशाच्या रिटेल बाजारात साखरेची सरासरी किंमत 39.68 रुपये प्रति किलो होती, जी 7 डिसेंबरला 43 ते 38 रुपयांवर गेली आहे. याशिवाय खुल्या चहाच्या दरातही 11.57 टक्क्यांनी वाढ झाली आहे. चहापुडीचे दर हे 238.42 रुपयांवरून 266 रुपयांवर गेले आहेत. याशिवाय दुधाच्या किंमतीतही जवळपास 7 टक्के वाढ होत आहे. दुधाची किंमत 46.74 रुपयांवरून 50 रुपये प्रति लीटर झाली आहे.

टोमॅटोच्या किंमतीत झाली वाढ
सध्याच्या दिवसात टोमॅटोची मागणीही वाढत आहे. 30 नोव्हेंबरपासून ते 7 डिसेंबरपर्यंत टोमॅटो 37.87 टक्के महाग झाले आहेत. किरकोळ बाजारात टोमॅटोची किंमत आज प्रति किलो 49.88 रुपये झाली आहे, 30 नोव्हेंबरला ती 36.18 रुपये प्रतिकिलोने विकले जात होते.

https://t.co/Ycl3Jch4by?amp=1

तेलाच्या किंमतीतही दिलासा
या व्यतिरिक्त खाद्य तेलांच्या दरात घट झाली आहे. पाम तेलाची किंमत 102 रुपयांवरून 92 रुपयांवर आली आहे. याशिवाय सूर्यफूल तेलाची किंमत 124 रुपयांवरुन 123 रुपयांवर आली आहे. शेंगदाण्याचे तेल 156 वरून 145 तर मोहरीचे तेलही प्रति लिटर 135 ते 132 रुपयांवर आले आहे. त्याचवेळी सोया तेलाच्या किंमतींमध्ये 6 टक्क्यांनी वाढ झाली आहे.

https://t.co/tXmbPr87wU?amp=1

स्वस्त झाले मैदा, तांदूळ आणि गहू
मंत्रालयाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार गहू, तांदूळ आणि मैद्याच्या किंमतीत सर्वसामान्यांना दिलासा मिळाला आहे. गव्हाच्या किंमतीत सुमारे 19.45 टक्क्यांनी घट झाली आहे. यावेळी गव्हाची किंमत 29 रुपयांवरुन 24 रुपयांवर आली आहे. याशिवाय किरकोळ बाजारात मैद्याची किंमत 32 रुपयांवरुन 28 रुपयांवर आली आहे. याशिवाय तांदळाचे दरही खाली आले आहेत. त्याच वेळी हरभरा आणि उडीद डाळही स्वस्त झाली.

https://t.co/5qXtwbOlUa?amp=1

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.