मी पीव्हर मराठा, कुणाच्या आवाजाला भीक घालत नाही ः आ. शशिकांत शिंदे

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके

मी मराठा आहे की नाही हे राज्यातील तरूणांना महिती आहे. मी मराठा समाजाच राजकारण करत नाही. मी पीव्हर मराठा म्हणून प्रत्येक आंदोलनात सहभागी होती. मी कुणाच्या आवाजाला भीक घालत नसल्याचे म्हणत माथाडी नेते नरेंद्र पाटील यांना प्रत्युत्तर आ. शशिकांत शिंदे यांनी दिले.

आ. शिंदे म्हणाले, मराठा आरक्षण रद्दचा निर्णय हा एका पक्षाने घेतला नाही, सर्वाेच्च न्यायालयाचा आहे. कालच्या प्रकारात मुलांच्या घरी जावून त्याच्या कुटुंबियाच्या समोर सांगितले होते. कुठे दुसरीकडे भेटलो नाही, विनंती केली आहे.

माझ्यावर का टीका केली मला माहीती नाही. नरेंद्र पाटील यांचे समर्थन करताय त्यांचीच भूमिका स्पष्ट होत नाही. देवेंद्र फडणवीस यांनीच 102 घटनेची दुरूस्ती, कायदा केला. जनतेच्या भावनांशी खेळू नये. मराठा आरक्षणांच्यावेळी तोडफोड झाली तेव्हा माझंच नाव आलं. राजकीय भांडवलं करण्यापेक्षा एकत्र येणे गरजेचे आहे. मराठा समाज आंदोलनात शशिकांत शिंदे पुढे असेल, असेही श्री. शिंदे म्हणाले.

ज्यांची भूमिका स्पष्ट, त्यांना भीतीचे कारण नाही

खा. छत्रपती उदयनराजे भोसले यांनी आमदार, खासदार यांना बाहेर पडू देवू नका असे म्हटले होते. त्यावर आ. शिंदे म्हणाले, ज्यांची भूमिका स्पष्ट आहे, त्यांना भीतीचे कारण नाही. ज्यावेळी आंदोलन सुरू होते, तेव्हा कोण कुठे होते ते प्रत्येकाला माहीती आहे. विधीमंडळांच्या आमदारांची बैठक बोलावली त्यांची यादी काढा. त्यामध्ये कोण बैठकीला हजर होते, त्यावरून मराठा समाजाच्याबद्दल कोणाला कळवळ होती दिसून येईल.

Leave a Comment