हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । प्रसिद्ध कॉमेडियन कुणाल कामराने (Kunal Kamra) त्याच्या कार्यक्रमात गाण्याच्या माध्यमातून महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर (Eknath Shinde) निशाणा साधला होता.. एकनाथ शिंदेंना गद्दार आणि ठाण्याचा रिक्षावाला म्हणून कुणाल कामराने टीका केली होती… या टीकेनंतर शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी संताप व्यक्त करत अंधरी येथील कुणाल कामराच्या स्टुडिओची तोडफोड केली…. तसेच कुणाल कामरा यांनी माफी मागावी अशी मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली होती…. या एकूण संपूर्ण प्रकरणावर भाष्य करत कुणाल कामरा यांनी सोशल मीडियावर भलीमोठी पोस्ट शेअर करत आपलं मत व्यक्त केलंय…. मी जे बोललो तेच अजित पवारहे एकनाथ शिंदे यांच्याबद्दल बोलले होते. मला या जमावाची भीती वाटत नाही आणि मी हे शांत होण्याची वाट पाहत माझ्या पलंगाखाली लपणार नाही, असं म्हणत कुणाल कामराने विरोधकांना ललकारलं आहे.
काय आहे कुणाल कामरा यांची पोस्ट –
कुणाल कामराने एक्स पोस्टवर प्रसिद्ध केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, ‘मनोरंजन स्थळ हे फक्त एक व्यासपीठ आहे. सर्व प्रकारच्या शोसाठी एक जागा आहे. माझ्या विनोदासाठी हॅबिटॅट जबाबदार नाही, किंवा मी काय बोलतो किंवा करतो यावर त्याचा कोणताही अधिकार किंवा नियंत्रण नाही. तसेच कोणताही राजकीय पक्ष हे करत नाही. एखाद्या विनोदी कलाकाराच्या शब्दांसाठी एखाद्या ठिकाणी हल्ला करणे हे तुम्हाला दिलेले बटर चिकन आवडले नाही म्हणून टोमॅटो घेऊन जाणारा ट्रक उलटवण्याइतकेच मूर्खपणाचे आहे.
My Statement – pic.twitter.com/QZ6NchIcsM
— Kunal Kamra (@kunalkamra88) March 24, 2025
अभिव्यक्ती स्वातंत्र्य हा प्रत्येकाचा अधिकार आहे. तो अधिकार फक्त श्रीमंतांकडे नाही. तुमच्यासारखे लोक सहन करू शकत नाहीत. एखाद्या वजनदार राजकीय माणसामुळं माझा जो अभिव्यक्तीचा हक्क आहे, त्यावर काही परिणाम नाही. मी कायद्याच्या विरोधात काहीही वागलेलो नाही. राजकीय सर्कशीवर आणि राजकारणावर मी व्यंगात्मक पद्धतीने बोट ठेवलं आहे. पोलिसांनी आणि न्यायालयाने माझ्याविरोधात कायदेशीर कारवाई करावी. मात्र, कायदा सर्वांसाठी समान असतो त्यामुळे अशाही लोकांविरोधात कारवाई झाली पाहिजे ज्यांनी ते हॉटेल फोडलं. एक जोक ऐकून त्यांनी हॉटेल फोडलं आहे. तसंच जे निवडून आलेले नाहीत, अशा महापालिका सदस्यांच्या विरोधातही कारवाई झाली पाहिजे अशी मागणी कुणाला कामराने केलीय..
आपल्या निवेदनाच्या शेवटी कुणाल कामरा म्हणतो, माझा फोन नंबर लिक केला आहे. त्यानंतर मला असंख्य कॉल आले आहेत. माध्यमांना माझं सांगणं आहे की, तुम्ही जे काही कव्हर करत आहात आणि बातम्या करत आहात त्याआधी एक बाब लक्षात ठेवा की, पत्रकारितेच्या स्वातंत्र्याबाबत आपल्या देशाचा क्रमांक १५९ वा आहे. मी जे बोललो तेच अजित पवार यांनी एकनाथ शिंदे यांच्याबद्दल बोलले होते. त्यामुळे मला या जमावाची भीती वाटत नाही असं कुणाल कामराने म्हंटल.