मुंबई । सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केलेल्या दाव्यांवर बोलण्यास एकनाथ खडसे यांनी बोलण्यास नकार दिला आहे. त्यांच्या दाव्यांवर उद्याच भाष्य करेल, असं विधान एकनाथ खडसे यांनी केलं आहे. भाजपला रामराम ठोकल्यावर भाजपचे बंडखोर नेते एकनाथ खडसे आज पहिल्यांदाच मुंबईत आले. त्यांच्यासोबत पत्नी मंदाकिनी खडसे आणि कन्या रोहिणी खडसेही आहेत. उद्या शुक्रवारी दुपारी 2 वाजता त्यांचा राष्ट्रवादीत प्रवेश होणार आहे.
दरम्यान, खडसे मुंबईत येण्यापूर्वी अंजली दमानिया यांनी पत्रकार परिषद घेऊन खडसेंवर घणाघाती हल्ला केला होता. खडसे हे खूनशी नेते आहेत, असं सांगतानाच त्यांच्याविरोधातील विनयभंगाचा खटला अजूनही संपलेला नाही, असं त्या म्हणाल्या होत्या. दमानिया यांच्या या दाव्यांबाबत खडसे यांना विचारले असता त्यांनी काहीही बोलण्यास नकार दिला. आज काही बोलणार नाही. उद्याच त्यावर बोलेल, इतकंच खडसे म्हणाले. तर आज राष्ट्रवादी नेत्यांनी तुमच्याशी संपर्क केला होता का? या प्रश्नावरही त्यांनी बोलणं टाळलं.
काय म्हणाल्या होत्या दमानिया?
मला पीआयने सांगितलं तुमची सीडी लॅबमध्ये पाठवलेली आहे. या प्रकरणाचा तपास झालेला नाही आणि तुमच्याविरोधात आरोपपत्रही दाखल झालेलं नाही. त्यामुळे तुमचा विनयभंगाचा खटला अजून संपलेला नाही, असं मला अधिकाऱ्याने सांगितलं, असं सांगतानाच विनयभंगाच्या खटल्याबाबत खडसे धांदात खोटं बोलत आहेत, असा दावा दमानिया यांनी केला आहे.
खडसेंनी त्यांच्या वाढदिवसाच्या दिवशी माझ्याबद्दल अश्लील वक्तव्य केलं. वाट्टेल ते बोलले. त्यामुळे वाकोला पोलीस ठाण्यात त्यांच्याविरोधात एफआयआर दाखल केला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात असं वक्तव्य शोभणारं नाही. त्यामुळे त्यांना धडा शिकवण्यासाठीच एफआयआर दाखल केला, असंही त्या म्हणाल्या.
मी दाखल केलेल्या एफआयआरवर पुढे काहीही झालं नाही. त्याला तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेच कारणीभूत आहेत. याप्रकरणात फडणवीसांनी सोयीचं राजकारण केलं. कोणत्याही सामाजिक कार्यकर्त्यांबाबत राजकारणी असंच राजकारण करतात, असं त्या म्हणाल्या. खडसेंवरील विनयभंगाचा गुन्हा संपलेला नाही. तरीही कालही ते वृत्तवाहिन्यांवरून धांदात खोटे बोलले. त्यामुळे माझ्या तळपायाची आग मस्तकात गेली, असा संतापही त्यांनी व्यक्त केला.
मोदी सरकारच्या 'या' निर्णयाने कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे मोडलं कंबरडं; आधी निर्यात बंदी आणि आता…
वाचा सविस्तर -👉 https://t.co/LANQV6hUyj@narendramodi @PMOIndia #HelloMaharashtra— Hello Maharashtra (@HelloMaharashtr) October 22, 2020
“विरोधी पक्षाने त्यांच्या काळात सरसकट कधी मदत दिली हे त्यांनी शपथ घेऊन सांगावं”- हसन मुश्रीफ
वाचा सविस्तर -👉 https://t.co/pQGwKna8rB@BJP4Maharashtra @Dev_Fadnavis @mrhasanmushrif @NCPspeaks #HelloMaharashtraa— Hello Maharashtra (@HelloMaharashtr) October 22, 2020
महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा 7972630753 हा संपर्क क्रमांक Hello News या नावाने सेव्ह करा. तुमचे नाव आणि जिल्हा आम्हाला इथे कळवा. ब्रेकिंग बातम्यासाठी लॉगइन : www.hellomaharashtra.in